Banners in Pune : आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

HomeपुणेBreaking News

Banners in Pune : आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

Ganesh Kumar Mule Apr 07, 2022 4:54 PM

PMC Election 2022 : पुणे महानगरपालिका जिंकण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न उध्वस्त होईल!
State Women’s Commission | राज्य महिला आयोगाने मागविला चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा
Dr Tessie Thomas | लोकमान्यांच्या स्वदेशीच्या विचारानेच अग्नि क्षेपणास्त्राचा पाया | डॉ. टेसी थॉमस यांचे प्रतिपादन

आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या

:  पुण्यात चंद्रकांत पाटलांचे बॅनर चर्चेत

पुणेकर हे टोमणे मारण्यात जगात प्रसिद्ध असल्याचं बोललं जातं. शिवाय, अनेकदा त्याचा प्रत्यय देखील येतो. किमान शब्दात कमाल अपमान करणे ही पुणेकरांची खासियत असल्याचंही सांगितलं जातं. शिवाय पुणेरी पाट्यांबाबत तर आणखी वेगळं काही सांगायलाच नको. पुणेरी पाट्यांवरील मजकूर तर जगभरात चर्चेत असतो. आता पुणेरी पाट्यांपाठोपाठ पुण्यात झळकणाऱ्या बॅनर्सची देखील चर्चा होताना दिसत आहे. कोथरूडमध्ये लावण्यात आलेले अशाचप्रकारेच एक बॅनर सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे, शिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. कारण, हे बॅनर ज्यांच्यासाठी लावलं आहे आणि या बॅनरवर जो मजकूर हे दोन्ही अर्थातच काही सामान्य नाही.

पुण्यातील कोथरुडमध्ये म्हणजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात हे बॅनर झळकले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचा फोटो असून, त्यासोबत ‘दादा परत’ या असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar

    ते बॅक टू पॅव्हेलियन झालेले आहेत त्यामुळे चिंता करू नये

DISQUS: 0