Dilip walse patil : सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

HomeपुणेPolitical

Dilip walse patil : सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Ganesh Kumar Mule Nov 21, 2021 3:32 PM

Three main roads in Dhayari, Narhe area will be developed!  |  Road work will be completed by July 30
Lokmat Office to Savitri Garden Road | लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता : 90% जागा ताब्यात | उर्वरित जागाही ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करणारच : अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे
Dhayari Narhe Road | धायरी, नऱ्हे परिसरातील तीन मुख्य रस्त्यांचा होणार विकास! 

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

पुणे:- सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिषदेप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा सहकारी सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक यतीनकुमार हुले आदी उपस्थित होते.

श्री. वळसे-पाटील म्हणाले, सहकारी पतसंस्था ह्या सर्वसामान्य नागरिकांच्या संस्था असून नागरिकांच्या गरजा भागविण्याचे काम करतात. सहकारी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला जातो. सहकारी संस्थांनी आजपर्यंत उत्तम काम करत गरजेनुसार नागरिकांना मदत केलेली आहे. सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून आवश्यक तेथे सहकार कायद्यात, शासन निर्णयात अनुकूल बदल करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0