Water Supply Cut | पुणे शहराच्या पूर्व भागाचा रविवारी पाणीपुरवठा बंद

HomeपुणेBreaking News

Water Supply Cut | पुणे शहराच्या पूर्व भागाचा रविवारी पाणीपुरवठा बंद

Ganesh Kumar Mule Sep 06, 2022 10:05 AM

Kid’s Festival | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या बालोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
Misbehavior in the subway | भुयारी मार्गामध्ये होणाऱ्या गैरप्रकारा विरोधात युवक राष्ट्रवादी चे कोथरूड पोलिस व महापालिकेस निवेदन
Pune Metro Security Guard  | मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत दोन जीव वाचवले

पुणे शहराच्या पूर्व भागाचा रविवारी पाणीपुरवठा बंद

पुणे | रविवारी भामा आसखेड येथील विद्युत पुरवठा म.रा.वि.वि.कंपनीचे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी
उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील तसेच खराडी वितरण व्यवस्थेमधील दुरूस्तीच्या कामासाठी या अखत्यारीतील पुणे शहराचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच सोमवार दिनांक १२/०९/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, इत्यादी