चार धरणातील पाणीसाठा पोहोचला ३.६७ टीएमसी वर
| धरण क्षेत्रात जोरदार पाऊस
पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ३.६७ टीएमसी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६७ टीएमसी इतका होता.
हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे ८ दिवसांचे पाणी वाढले आहे.
सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला हे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ६८ मिमी, वरसगाव ७० मिमी तर टेमघर धरणात ६५ मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.