पालखी सोहळ्याच्या दिवशी 24 तास पाणी मिळावे
| विशाल धनवडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागणी
पुणे | संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात मुक्काची असल्याच्या दोन्ही दिवशी शहरात 24 तास पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या सोहळयानिमित्त सुमारे 8 ते 10 लाख वारकरी पुणे मुक्कामी असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी मोठया प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासते अशा वेळी पालिकेने दरवर्षी प्रमाणे या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
याशिवाय, पालखी मार्गाचे रस्ते दुरूस्त करावेत, पावसाळयाचे दिवस असल्याने भवानीपेठ, नाना पेठ परिसरात मांडवाची व्यवस्था करावी, पालखी मार्गात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. गजानन पंडित, विभाग प्रमुख चंदन साळुंके, स्वाती कथलकर, भाऊ शिंदे, योगेश खेंगरे , अनिकेत थोरात , अनिल ठोंबरे, सनी मुसळे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
COMMENTS