Water cuts in Pune | दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी या उपाय योजना करा !
| माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी
Water cut in Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने 18 मे पासून पुणे शहारामध्ये दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद (water cut in Pune) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यापूर्वी काही उपाय योजना करावी. कारण पुणे शहराच्या आजुबाजूला असणाऱ्या उपनगरामध्ये म्हणजेच प्रभाग क्र 31 व 32 वारजे माळवाडी मध्ये ज्या वेळेस क्लोजर घेण्यात येतो तेव्हा पुढील चार दिवस पाणी पुरवठा बंद असतो किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल होतात. हा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत या साठी काही उपाय योजना आपण करावी. अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे (PMC Pune water supply department) केली आहे. (Water cut in Pune)
: हे करा उपाय
कमीत कमी 80% भरणे गरजेचे आहे. तसेच बुधवारी रात्री कुंभारवाडी टाकी भरणे गरजेचे आहे.
2 ) खडकवसला पंपिंग स्टेशन दरवेळेस रात्री 12 ते 1 किंवा 2 या वेळे प्रमाणे चालू होते, त्या ऐवजी
पंपिंग दर गुरुवारी रात्री 9 ते 10 या वेळे दरम्यान चालू झाले पाहिजे.
4 ) पंपिंग ची लाईट गेल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होतो, एम.एस.ई.बी चा एक फिडर बंद झाल्यास
दुसऱ्या फिडर वरुन लाईन चालू ठेवण्याची व्यवस्था एम.एस.ई.बी यांच्याकडून सुधारणा व्हावी व जनरेटर
मोठ्या प्रमाणाचा बसवावा.
5 ) एल अँड टी च्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवावा.
6 ) ज्या भागात पाणी पुरेसे मिळत नाही त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा.
7 ) वारजे माळवाडी भागात पाणी पुरवठा मेंटेनेसची कामे कमी असल्याने शक्यतो क्लोजर रद्द करावा.
8 ) काही बैठ्या सोसायटी मध्ये चढावर असणाऱ्या घरांना पाणी मिळत नाही यासाठी वॉल सिस्टिम
करावी. (Pmc Pune water cuts)