भारत-पाकिस्तान सामना बघा पुण्यातील सर्वात मोठ्या LED स्क्रीनवर!
: नगरसेवक अमोल बालवडकर यांचा उपक्रम
पुणे : T२० विश्व चषकातील सर्वात चित्त थरारक सामना म्हणजे पारंपारिक शत्रू अशी ओळख असलेले भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आज ७:२० ला सायंकाळी होणार आहे. त्याची सर्व विश्वच वाट पाहत आहे. पुणेकर देखील त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुणेकरांना हा सामना मोठ्या LEDस्क्रीनवर पाहायला मिळण्याची संधी बालेवाडीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. बालेवाडीतील दसरा चौकात हा LED ठेवण्यात येईल. जिथे एकाच वेळी ५ हजार लॉक याचा आनंद घेऊ शकतील.
५ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था
T२० विश्व चषक नुकताच सुरु झाला आहे. मात्र अजून पर्यंत भारताचा सामना झालेला नाही. भारताचा पहिलाच सामना आज सांयकाळी होत आहे. हा सामना पाहण्यासाठी सर्व जग आतुरतेने वाट पाहत आहे. कारण हा सामना होणार आहे पाकिस्तानसोबत. त्यामुळे पूर्ण जगाची या सामन्याकडे नजर लागून राहिली आहे. आतापर्यंत T२० मध्ये भारत एकदाही पाकिस्तान कडून हरलेला नाही. त्यामुळे आज भारतिय टीम कसा खेळ करणार याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. भारत देशासोबत पुणेकर देखील त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुणेकरांना हा सामना मोठ्या LEDस्क्रीनवर पाहायला मिळण्याची संधी बालेवाडीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. बालेवाडीतील दसरा चौकात हा LED ठेवण्यात येईल. जिथे एकाच वेळी ५ हजार लॉक याचा आनंद घेऊ शकतील. आज सांयकाळी ७ वाजले पासून नागरिक याचा आनंद घेऊ शकतील. शिवाय काही विशेष आकर्षण देखील असतील. असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.
COMMENTS