वारकऱ्यांचा मेळा पुण्यनगरीत! | महापालिकेने केले स्वागत
: दोन वर्षांच्या खंडानंतर ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला. पुणेकरांसह वरुणराजानेही संतांच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सकाळपासून शहर व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ होते. तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.
दरम्यान महापालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, कुणाल खेमणार आणि विलास कानडे यांनी भाविकांचे स्वागत केले.