Warje Ward Office | वारजे येथील गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका

Homeadministrative

Warje Ward Office | वारजे येथील गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका

Ganesh Kumar Mule Nov 11, 2024 7:17 PM

OPS | NPS | नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती
Rejuvenation Project | PMC Pune | कै. विलासराव तांबे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस
Women Self Help Group | Hari Sawant | हडपसर परिसरात गोरगरीब महिलांचे बचत गट | भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचा पुढाकार 

Warje Ward Office | वारजे येथील गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – आज वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या गणपती माथा ते शिंदे पूल हा एनडीए कडे जाणारा रस्ता कायमच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या वाहनांनी गजबजलेला असतो. नागरिकांना सदर रस्त्यावरून जाताना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. अशा व्यवसायिकांवर अतिक्रमण विभागाकडून व मध्यवर्ती पथकाकडून धाडसी कार्यवाही करण्यात आली. गेली अनेक वर्ष नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रारी येत होती परंतु काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यवसायिक व राजकीय हस्तक्षेपामुळे या ठिकाणी कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.

साधारण 16 व्यावसायिक टेम्पो, 06 बिगर टप हातगाडी, 1 टप हात गाडी, 3 नग होजिअरी, 3 लोखंडी काउंटर, 3 गॅस सिलेंडर, 1 फ्रीज, 1 लोखंडी बाकडा व स्टूल, 1 छत्री व 1 मोठे डिजिटल स्टॅन्ड जप्त करण्यात आल्या. वाहनांवर कारवाई करत असताना वाहने पळवणे, धोकादायक रित्या सेवकांच्या अंगावर वाहने घालवणे अशा प्रकारच्या विकृती व्यवसाय धारकांकडून चालू असतानाही कारवाई चालू ठेवून सक्षमपणे कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे यांनी सलग तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती पथक व जवळील क्षेत्रीय कार्यालयाकडील सेवकांना बोलाऊन सक्षमपणे अनधिकृत व्यवसायिकांवरील कारवाई चालू ठेवली. 1 अतिक्रमण निरीक्षक ,9 सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, 32 बिगारी सेवक, 2 एमएसएफ पथक व 3 ट्रक यांचे मार्फत ही कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली , महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, अतिक्रमन निरीक्षक अजय गोळे सहाय्यक अतिक्रमन निरीक्षक श्रीमती किरण डवरी, राकेश काची, कुणाल मुंडे, राहुल बोकन , राहुल डोके, सचिन जाधव, शिवशंकर वाडीकर, सागर विभूते व प्रथमेश पाटील यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली.

अजय गोळे यांनी अनधिकृत व्यवसाय धारकांना आव्हान केले आहे की, वारजे क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अनेक व्यवसाय धारक रस्त्यावर फुटपाथवर व सोसायटी साईड मार्जिन मध्ये अनधिकृत रित्या व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनात येत असल्याने आम्ही कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांच्यामार्फत अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह विभाग मिळून संयुक्तरित्या येणाऱ्या पुढील काळात कारवाया प्रस्थापित करणार आहोत, त्यामुळे कोणीही अनाधिकृत व्यवसाय करू नये याची व्यवसायिकांनी नोंद घ्यावी असे आव्हान केले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0