ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील,पदार्थ विज्ञान विभागातील माजी विद्यार्थ्यांचा (सन १९९० ते२०२२) स्नेहमेळावा मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी दिली. माजी विद्यार्थी आर्चीरिकल प्रायव्हेट लिमिटेड मुंबईचे सी.ई.ओ श्री.कैलास चिलप सर उपस्थिम होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.व्ही.एम.शिंदे सर होते. पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. एस.एफ. ढाकणे उपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात कैलास चिळप सर म्हणाले”आजच्या युगात भौतिक शास्त्रात अनेक चांगल्या संधी उपलब्ध असून आपण आपले त्यातील कष्ट, जिद्द, मेहनत केल्यास आपल्याला निश्चित दैदीप्यमान यश मिळू शकेल.तसेच बदलत्या काळाबरोबर आपण नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपला प्रवास केल्यास आपणास उत्कृष्ट ज्ञान, पगार.सन्मान व समाधान मिळू शकेल. आपण नवीन तसेच बदलल्या काळा बरोबर तंत्रज्ञान आत्मसात करून आपला प्रवास केल्यास आपणास योग्य दिशा मिळते. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीची गरज असेल त्यांनी माझ्याशी संपर्क केल्यास मी माझ्या कंपनी मार्फत इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ शकतो. आता पर्यंत२५ते ३० विद्यार्थ्यांना तशी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
प्रत्येक विद्यार्थ्याने आपली ओळख करून देऊन मनोगत व्यक्त केले.महाविद्यालयाने आमच्यासाठी जे कष्ट घेतले ते आम्ही कधीही विसरणार नाही. विद्यार्थ्यांचा एक संघ करून त्या मार्फत आम्ही महाविद्यालयासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन देतो. असे सर्वांनी एकमुखाने सांगितले .पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ . ढाकणे सुंदरराव हे पुढील महिन्यात नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्यामुळे त्यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ.ढाकणे सर यांनी विभागाची B.Sc,M.Sc ते पीएच.डी पर्यंत वाटचाल कशा पद्धतीने झाली. याचा प्रवास उलगडून सांगितला व माजी विद्यार्थी अनेक चांगल्या पदावर काम करत असल्याबद्दल कृतकृत्य झाल्याचे समाधान व्यक्त केली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.व्ही.एम.शिंदे म्हणाले”नवीन शैक्षणिक धोरणाची २०२३-२४पासून अंमल बजावणी करण्यात येणार आहे.त्यासाठी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग सुसज्ज आधुनिक प्रयोगशाळेसह त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बोराटे यांनी केले.प्रा. डॉ.अजय कवाडे व प्रा.डॉ.निलेश हांडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल डुंबरे व प्रा.शामल ढमाले यांनी केले तर आभार प्रा.स्वप्नाली साबळे यांनी मानले.