Voting Certificate | मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे  | मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

Homeadministrative

Voting Certificate | मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे | मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

Ganesh Kumar Mule Nov 15, 2024 8:14 PM

Dr Suhas Diwase IAS | निवडणूक प्रक्रिया महत्त्वाचे कार्य असून या प्रक्रियेत वैयक्तिक हितसंबंधाला महत्त्व देता कामा नये | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Don’t let citizens boycott voting because of water | Collector Dr. Suhas Diwase’s order to Pune Municipal Commissioner
Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

Voting Certificate | मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

| मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

 

Vidhansabha Election Voting – (The Karbhari News Service) – मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत; त्याअंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास मतदाराला प्रमाणपत्र मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. (Pune Election News)

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) अंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ही मतदारासाठी गौरवाची बाब असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. मतदारांना मतदानाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी एक क्यूआर कोड तयार करण्यात आला असून त्याचे स्टीकर्स सर्व विधानसभा मतदार संघांना वितरीत करण्यात आले आहेत.

मतदान केल्यानंतर मतदान केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून त्यासाठी मतदान केंद्राबाहेरील स्टीकरवरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर उघडणाऱ्या फॉर्ममधील माहिती अचूक भरावी तसेच मतदानाची शाई असलेल्या बोटासोबतचा सेल्फी अपलोड करावा. त्यानंतर आपण फॉर्ममध्ये भरलेल्या ई-मेल वर आपले मतदान केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ.‍ दिवसे यांनी केले आहे.
0000

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0