Voter List | मतदार यादीत नाव नोंदणीसह इतर तपशील अद्यावत करण्याचे आवाहन

State Election Commission of Maharashtra

Homeadministrative

Voter List | मतदार यादीत नाव नोंदणीसह इतर तपशील अद्यावत करण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Aug 10, 2024 10:56 AM

Cricket Legend Sachin Tendulkar begins his innings as National Icon for ECI, to bat for greater voter turnout
ECI | RVM | घरापासून दूर असलात तरी आपल्या गावात करता येणार मतदान |निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत
cVIGIL App | ECI | आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा | भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

Voter List | मतदार यादीत नाव नोंदणीसह इतर तपशील अद्यावत करण्याचे आवाहन

Vidhansabha Election 2024 – (The Karbhari Service) – महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातंर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. तरी सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घेण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वार केले आहे. (Maharashtra Election Commission)

मतदार यादीत नाव तपासणे का गरजेचे

नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात. त्यांचे नाव मतदार यादीत आढळले नाही की, ते मताधिकाराला मुकतात. बऱ्याचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते, तिथेच आपले नाव असेल, असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात. मात्र मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते. या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही, असे समजून ते मतदानाला मुकतात. मतदार ओळखपत्रात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक इ. वैयक्तिक तपशिलांत चुका असल्यास त्यात दुरुस्ती करण्यात यावी, मतदाराला असे ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत. दुसर महत्वाच म्हणजे मतदानाच्या वेळीही ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचं ठरू शकतं त्यामुळेही हे बदल करून घेणे आवश्यक असतं.

जेणेकरून मतदार यादीत आपले नाव नसेल तर आपण मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतो, तसेच आपल्या वैयक्तिक तपशिल अथवा पत्त्यात बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करायची गरज असेल तर त्यासाठीचे अर्जही वेळेत भरू शकतो.

*मतदार यादीत नाव कसे तपासावे:*

ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार यादीत आपले नाव शोधता येते. ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत एक voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि दुसरा Voter Helpline App या सेवा उपलब्ध आहेत. Voter Helpline App च्या होम पेजवरील Search Your Name In Electoral Roll हा पर्याय निवडला की, वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्यूआर कोड आणि मतदार ओळखपत्र क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.

voters.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाइल नंबर या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपलं नाव शोधण्याचे पर्याय दिसतात. आपण एसएमएसद्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाइलवरून ‘ECI <स्पेस><मतदान ओळखपत्र क्रमांक>हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही पीडीएफ स्वरुपातील मतदार यादी उपलब्ध असते. आपल्या मतदारसंघातील यादी भागानुसार ही मतदार यादी डाऊनलोड करून आपण त्यात आपले नाव तपासू शकता. या सोबतच आपण जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तिथे उपलब्ध असलेल्या मतदारयादीच्या प्रतीतही आपण आपले नाव तपासू शकतो. नागरिकांनी त्वरित आपले नाव तपासावे आणि आपला मताधिकार सुनिश्चित करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
००००

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0