Vijaystambh | विजयस्तंभ शौर्यदिन नियोजन व समन्वयासाठी सरपंच व समिती सदस्यांची संयुक्त बैठक
Perane Fata – (The Karbhari News Service) – कोरेगाव भिमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भिमअनुयायांना देण्यात येणार्या सर्वच पायाभूत सोयी सुविधा व सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आज विजयस्तंभ पेरणे येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News)
भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे सल्लागार व माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे व समिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांचेसह पेरणे गांवच्या सरपंच सौ. उषाताई वाळके , कोरेगांव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे , माजी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ वाळके , किरण सोनवणे , दशरथ वाळके व इतर मान्यवर बैठकीत सहभागी झाले होते.
” सध्या विजयस्तंभ पंचक्रोशीत कोणत्याही स्वरुपाचा तनाव नसुन गांवकरी विजयस्तंभ शौर्यदिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणुन प्रयत्नशील आहेत. तसेच शासनाच्या वतिने सातत्याने बैठका होत असुन अचुक नियोजन सुरु आहे. पंचक्राोशीतील सर्वच ग्रामपंचायती अनुयायांच्या स्वगतासाठी सज्ज आहेत अशी माहीती सरपंच सै. उषाताई वाळके व संदिप ढेरंगे यांनी यावेळी दिली.
” यंदाच्या वर्षी उच्चांकी गर्दी होणार असुन सर्व अनुयायी हे केवळ अभिवादनासाठीच या ठिकाणी येत असल्याने व गेल्या सात वर्षापासूनच्या नियोजनात स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने आनंदाचे वातावरण आहे. परभणी येथिल घटनेचा कोणताही तनाव उत्सवावर नसुन मागील वर्षी पेक्षा अधिक दर्जेदार पध्दतीने यंदा उत्सव साजरा होणार आहे. तरी नागरीकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता मोठ्या संख्येने शौर्यदिन कार्यक्रमात सहभागी व्हावे असे अवाहन समितीचे डॉ. सिध्दार्थ धेंडे व राहुल डंबाळे यांनी केले.
COMMENTS