Vidhansabha Election 2024 | मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध- अनिल पवार

Homeadministrative

Vidhansabha Election 2024 | मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध- अनिल पवार

Ganesh Kumar Mule Nov 17, 2024 7:55 PM

Pune PMC 32 Villages Committee | समाविष्ट 32 गावांच्या लोकप्रतिनिधींच्या समितीत अजून तीन सदस्य  | जाणून घ्या नवीन सदस्य  
Arvind Shinde | PMC Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागावर अरविंद शिंदे यांचे आहे लक्ष! | महापालिका आयुक्त यांच्याकडे केल्या या मागण्या | वाचा सविस्तर 
Chandni Chowk | चांदणी चौकातील जुना पूल पडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

Vidhansabha Election 2024 | मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध- अनिल पवार

 

Vidhansabha Election Pune – (The Karbhari News Service) –  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदार केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६४ मतदान केंद्रे असून ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष, ३ लाख १५ हजार ११५ महिला, तर ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मोबाईल मतदान करण्यासाठी सोबत आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. सर्व उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे, असे निर्देशही निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले आहेत.
——–

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मनाई आदेश निर्गमित केले आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सदर वेळेत वाणिज्यीक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, भ्रमणध्वनी, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले, व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व चिन्हांचे प्रदर्शन निवडणूक प्रक्रियेमध्ये समावेश असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस जवळ बाळगणे, वापरणे अथवा खासगी वाहन प्रवेश करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३चे कलम १६३ अन्वये मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0