Video | Pune Truck Accident | खड्ड्यात पडलेला ट्रक बाहेर काढण्यात अखेर यश! Video देखील पहा

Homeadministrative

Video | Pune Truck Accident | खड्ड्यात पडलेला ट्रक बाहेर काढण्यात अखेर यश! Video देखील पहा

Ganesh Kumar Mule Sep 20, 2024 11:04 PM

Pan-Aadhaar Link | पॅन कार्डबाबत आयकर विभागाचा सर्वात मोठा इशारा | चुकल्यास पैसे द्यावे लागणार 
Transfer | PMC Pune | पुणे महापालिकेची नियतकालिक बदल्याबाबत कार्यवाही सविस्तर जाणून घ्या 
Health Camp | PMC pune | पुणे मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर | आरोग्य विभागाचा उपक्रम

Video | Pune Truck Accident | खड्ड्यात पडलेला ट्रक बाहेर काढण्यात अखेर यश! Video देखील पहा

 

Pune Truck Accident- (The Karbhari News Service) – पुण्यात सिटी पोस्ट आवारात खड्डयात पडलेला ट्रक व एक दुचाकी अग्निशमन दल व महापालिकेच्या आणि इतर विभागाच्या सहाय्याने क्रेन वापरत बाहेर काढण्यात यश आले आहे. सुदैवाने जखमी वा जिवितहानी झालेली नाही. (Pune Fire Brigade)

आज शुक्रवार  रोजी पुणे बुधवार पेठ, बेलबाग चौक येथील सिटी पोस्ट आवारा मध्ये ड्रेनेज चोकअप बाबत समर्थ पोलीस स्टेशन कडून भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयास तक्रार आली होती, त्यानुसार ड्रेनेज कोठी ,भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयामार्फत ड्रेनेज स्टाफ व Recycler Suction (MH 42 .HQ. 6171) पाठवून सदरील ठिकाणचे ड्रेनेज चोकअप बाबत तक्रारीचा निवारण करण्यात आले.


ड्रेनेज क्लिनिंग चे काम करून recycler suction machine सिटी पोस्ट च्या आवारातून बाहेर पडत असताना अचानक मागच्या बाजूने जमीन खचुन तयार झालेल्या विहीर सदृश्य गोल खड्ड्यांमध्ये पडली. या दरम्यान गाडीच्या ड्रायव्हरने गाडी बाहेर उडी मारुन बाहेर आला.

या घटनेची माहिती फरासखाना पोलीस स्टेशन कार्यालयामार्फत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयास दुपारी ४:१५ वां. मिळाली . घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेकडील अग्निशामक दल व क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकारी, उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ डॉ.चेतना केरुरे , खातेप्रमुख पंथ विभाग श्री. अनिरुद्ध पावसकर, श्री. दिनकर गोजारे , श्री सुहास जाधव, महापालिका सहाय्यक आयुक्त कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय श्री.किसन दगडखैर महापालिका सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय , अग्निशामक अधिकारी श्री कमलेश चौधरी व इतर सर्व संबंधित कर्मचारी घटना स्थळावरुन पोलिस प्रशासन , आवश्यक क्षमतेच्या क्रेन , विद्युत विभाग यांचे समन्वयाने
अंदाजे २० फूट खड्ड्यात गेलेल्या पंधरा टनाच्या recycler suction machine ला बाहेर काढण्याकरिता प्रत्येकी 15 टन क्षमता असलेले दोन क्रेन मागवण्यात आले.


सिटी पोस्ट ऑफिस हे शहरातल्या गजबजलेल्या रहदारीचा परीसर असल्याने तसेच सायंकाळचे खूप ट्रॅफिक च्या कारणाने सदरील दोन्ही क्रेन पुणे मनपाकडील अग्निशामक दलाचे RESCUE VAN ने एस्कॉर्ट करत ट्रॅफिक पोलीस च्या मदतीने रहदारी थांबून घटनास्थळी आणण्यात आली.
त्यानंतर दोन्ही क्रेन च्या साह्याने recycler suction machine व एक दुचाकी खड्ड्याच्या बाहेर काढण्यात आली.

घटनास्थळी माननीय महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (भा.प्र. से) यांनी पाहणी करून घटनेची कारणमिमांसा जाणुन घेण्यासाठी सिटी पोस्ट ऑफिस तसेच मेट्रो व पुणे महानगरपालिकेकडील तांत्रिक अधिकारी प्राथमिक चौकशी करुन शहानिशा करतील असे सुचित केले. सदरिल घटना सिटी पोस्ट या कार्यालयाच्या प्रांगणात घडलेली असल्याने मा.आयुक्तांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना पुढिल आवश्यक कार्यवाही करणे बाबत आदेश दिले.