Hadapsar | Market | हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार!   | नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा

HomeपुणेBreaking News

Hadapsar | Market | हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार! | नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा

Ganesh Kumar Mule Apr 05, 2023 2:17 AM

Pune Air Pollution | नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 6 बिल्डरांना महापालिकेकडून नोटीस
Registered Hawkers : आता नोंदणीकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा  : नियमाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कडक कारवाई 
PMC Pune Encroachment Action |पुणे महापालिका कर्मचारी उद्या करणार काम बंद आंदोलन!

हडपसर मधील भाजी मंडई पूर्ववत होणार!

| नागरिक आणि गाळेधारकांना दिलासा

पुणे | हडपसर मधील चिंतामणी नगरच्या (Cihintanani Nagar, Hadapsar) भाजी मंडई ला (vegetable market) शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती. त्यामुळे इथल्या  गाळेधारकांचे खूप नुकसान झाले होते. तेव्हापासून भाजी मंडई बंद आहे. मात्र आता लवकरच मंडई पूर्ववत होणार आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया (tender process) लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Deputy commissioner Madhav jagtap) यांनी दिली.

– 84 लाखाचा खर्च

हडपसर येथील ओटा मार्केटला दि.२१/२/२०२३ रोजी शॉर्टसर्किटमुळे आग लागून मार्केटचे व व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 90 दुकाने यामध्ये जळाली होती. सद्यस्थितीमध्ये मार्कट बंद आहे. त्याभागातील नागरिकांचे गैरसोय होत असल्याने तेथील स्थानिक आमदार चेतन तुपे व माजी सभासद  नाना भानगिरे यांनी उपरोक्त ठिकाणी भेट देऊन ओटा मार्केटचे कामकाज प्रशासनामार्फत त्वरित करणेबाबत सुचविले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. (PMC Pune)
या कामासाठी 84 लाख 30 हजाराचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला हे काम महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७ (३)(क)नुसार करून घेण्याबाबत वित्तीय समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी हे काम शॉर्ट टेंडर प्रक्रिया करून घेण्याचे आदेश खात्याला दिले. दरम्यान मार्च एन्ड ला हे काम खात्याकडून होऊ शकले नाही. तसेच नवीन बजेट मध्ये यासाठी खात्याला निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे भवन रचना विभागाकडील निधीचे लॉकिंग करून लवकरच टेंडर प्रक्रिया सुरु करणार असल्याचे माधव जगताप यांनी सांगितले. यामुळे येथील गाळेधारक आणि नागरिकाना दिलासा मिळणार आहे. (Pune Municipal Corporation)