निष्क्रिय मुळीकांना 2019 लाच वडगावशेरीकरांनी जागा दाखविली
| आमदार सुनिल टिंगरेंचे प्रत्युत्तर
पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी 2019 लाच जगदिश मुळीकांना घर पाठवून ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले आहे. मोदी लाटेतही त्यांना निवडून येता आले नाही. आता माझ्या कामांचा धडका पाहून आता मुळीकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे असे प्रतिउत्तर आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले आहे.
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका भवनासमोर केलेल्या उपोषणावर मुळीक यांनी टिका केली होती. त्यावर उत्तर देताना आमदार टिंगरे म्हणाले, राजकिय आरोप न करता केवळ मतदारसंघातील प्रश्नांसाठी मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, या उपोषणाला केवळ मतदारसंघातूनच नाही तर शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुळीक़ घाबरून गेले. खर तर पाच वर्ष ते आमदार होते. महापालिकेत त्यांची एकहात्ती सत्ता होती. असे असताना त्यांना हे प्रश्न सोडविता येऊ शकले नाही. मी विरोधी पक्षात असून मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणला आहे. प्रमुख प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुळीकांनी निरर्थक पोपटपंची केली आहे.