Vaccination: जिव्हाळा सोशल फाउंडेशन कडून मोफत लसीकरण

Homeपुणेआरोग्य

Vaccination: जिव्हाळा सोशल फाउंडेशन कडून मोफत लसीकरण

Ganesh Kumar Mule Sep 25, 2021 8:09 AM

Chemist Association : online pharmacies : सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या ऑनलाइन फार्मसी वर कारवाई करा  : केमिस्ट असोसिएशन
Health Camp | ६ ऑगस्ट रोजी “विनामुल्य आरोग्य शिबीर” | सोमेश्वर फॉऊंडेशन चा उपक्रम 
How to Prevent Diabetes | जर तुम्हाला मधुमेह नसेल तर ते चांगलेच आहे | मात्र भविष्यात तो टाळण्यासाठी ही पावले उचला

जिव्हाळा सोशल फाउंडेशन कडून मोफत लसीकरण

: संस्थापक राहुल तुपेरे यांची माहिती

पुणे : प्रभाग क्र ३० मध्ये जिव्हाळा सोशल फाउंडेशन, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान,आणि निरामय यांच्या  राहुल तुपेरे (संस्थापक.जिव्हाळा सोशल फाउंडेशन) यांच्या प्रयत्नातून मोफत कोरोना लसीकरण करून,सर्वांना मास्क वाटप करण्यात आले.

: नागरिकांनी घ्यावा लाभ

पानमळा,दांडेकर पूल,या भागातील नागरिकांना पहिला डोस सुद्धा मिळाला नव्हता,परंतु राहुल तुपेरे यांच्या अथक प्रयत्नानंतर पानमळा येथे लसीकरण केंद्र मिळाले,त्या साठी संस्थेचे उपाध्यक्षा  मीरा तुपेरे, कुणाल वाघमारे, अनिकेत कांबळे, ऋषिकेश तुपेरे. हिराचंद वाघमारे,अतुल क्षिरसागर, यमुना म्हस्के,आणि निरामय चे  डॉक्टर्स,अखिल पानमळा वसाहत मित्र मंडळाचे पदाधिकारी इत्यादींचे परिश्रम लाभले,
ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे  त्यांनी  राहुल तुपेरे यांचे जनसंपर्क कार्यालय, पानमळा वसाहत, सिंहगड रोड पुणे -३०  याठिकाणी संपर्क साधावा असे अवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.