Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 

HomeBreaking Newsपुणे

Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 

Ganesh Kumar Mule Feb 11, 2023 12:17 PM

Fursungi, Uruli Devachi Water Supply Scheme | फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून २४ कोटी सात लाख मंजूर | खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश
Uruli Devachi | Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली | राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
Fursungi TP Scheme | फुरसुंगी टीपी स्किमचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता

कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार!

| मुख्य सभेसमोर प्रस्ताव

पुणे | महापालिका हद्दीत समाविष्ट उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावांची नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान ही गावे वगळण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचे निर्देश राज्य सरकारने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करून शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही गावातील कचरा डेपोची जागा महापालिका हद्दीत ठेवली जाणार आहे. उर्वरित गावे महापालिका हद्दीतून वगळली जाणार आहेत. या प्रस्तावावर येत्या मुख्य सभेच्या बैठकीत चर्चा होईल. (PMC Pune)
मुख्य सभेसमोरील प्रस्तावानुसार राज्य सरकारच्या मान्यतेनुसार २०१७ साली नवीन ११ गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आली. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन गावांमधुन जाणा-या ६५ मी रुंदीच्या रिंगरोडसाठी अंदाजे ५५५ हेक्टर क्षेत्रावर नगर रचना परियोजना राबवविण्याचा प्रस्तावास महानगरपालिकेच्या  मुख्य सभेने २०१९ ला मान्यता दिली आहे.  सद्यस्थितीत दोन्ही टीपी स्कीम ना सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेकडून उक्त नगर रचना योजनांबाबत सुमारे ६० ते ७०% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगती पथावर आहेत. (Uruli devachi and Fursungi)
२०१८ साली पुणे महानगरपालिकेकडून शासनाचे राजपत्रात तसेच वर्तमानपत्रात इरादा प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर ११ गावांचा प्रारूप विकास योजना आराखडा बनविण्याचे काम अंतिम टप्यामध्ये आहे. तथापि पुणे महानगरपालिकेत नव्याने सामाविष्ट गावातील फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करणेबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०६/१२/२०२२ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत ‘सदर गावे पुणे महानगरपालिकेत असणे आवश्यक आहे’ असा नगर अभियंता विभागाचा अभिप्राय असल्याचे नगर विकास विभागाकडून तयार करण्यात आलेल्या या बैठकीच्या इतिवृतात नमूद केलेले आहे. मात्र या बैठकीत मुख्यमंत्री यांनी “फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात यावी. उरुळी, फुरसुंगी येथील कचरा डेपोची जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ठेवण्यात यावी” असे निदेश दिले. त्यानुसार  \उक्त गावांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळण्याबाबत अधिनियमनातील तरतुदी नुमार कार्यवाही करून तसा प्रस्ताव शासनास तात्काळ उपलब्ध करून दयावेत असे कळविले होते. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकेमधील फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांमध्ये नागरी सेवा सुविधांसाठी लागणारी आरक्षणे आणि सक्षम अशा रस्त्यांचे जाळे यांचा अभाव दिसून येतो. या गावांमध्ये नागरीकारणाचा वेग झपाट्याने वाढत असून यामुळे सदर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंठेवारी स्वरुपाची बांधकामे झालेली होती. २०१७ मध्ये उक्त गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर आजतागायत या गावांमध्ये तीन प्रारूप नगर रचना योजना, प्रारूप विकास आराखडा, रस्ते, पाणी पुरवठा वाहिन्या, जलशुद्धीकरण प्रकल्प योजना, मल:निसारण योजना वाहिन्या, शैक्षणिक व आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याची कामे पुणे महानगरपालिकेकडून चालू आहेत. नवीन समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी पुरवठा वाहिन्या, जलशुद्धीकरण प्रकल्प योजना, मल: निसारण योजना वाहिन्या विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सन २०२२-२३ च्या व त्यापूर्वीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली असून या विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. उपरोक्त पार्श्वभूमीवर मा. मुख्य सभा ठराव क्र. ५३५ दि.१८/१२/२०१३ अन्वये सदर गावे समावेश करणेस मा. मुख्य सभेकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे यापुर्वीच पुणे महानगरपालिकेकडून या गावांचा समावेश करणेबाबत अभिप्राय शासनास सादर करण्यात आलेला होता. सदर गावे समावेश करणेबाबत शासन निर्णयानंतर उरुळी देवाची व फुरसुंगी या गावामध्ये समाविष्ठ ११ गावांपैकी सुमारे ७.७८% क्षेत्रावर नगर रचना योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित ९२.२२% क्षेत्रावरील प्रारूप विकास आराखड्याचे काम देखील अंतिम टप्यात आले आहे. (PMC Pune News)
असे असले तरी मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार उरुळी देवाची व मौजे फुरसुंगी येथील पुणे महानगरपालिकेची कचरा डेपोची जागा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ठेऊन उर्वरित भाग पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळणेबाबतचा प्रस्ताव  शासनास सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती मार्फत मुख्य सभेसमोर मान्यता मिळणेसाठी ठेवला आहे. यावर आगामी बैठकीत चर्चा होईल.  (PMC Pune)