UPSC Exam : बार्शी ची पोरं लय हुशार : बार्शी ने घडवला इतिहास:

HomeBreaking Newsमहाराष्ट्र

UPSC Exam : बार्शी ची पोरं लय हुशार : बार्शी ने घडवला इतिहास:

Ganesh Kumar Mule Sep 25, 2021 6:17 AM

Pune Loksabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांकडून पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा
Art Of Living | आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
The 48 Laws of Power | Robert Greene Book | रॉबर्ट ग्रीनच्या “शक्तीचे 48 नियम” पुस्तकामध्ये असे काय आहे जे वाचायलाच हवे | जाणून घ्या सर्व काही  

UPSC परीक्षेत बार्शी ने घडवला इतिहास

: तालुक्यातून  टॉपर ची संख्या वाढताना दिसतेय

बार्शी : बार्शी तालुक्यातील अजिंक्य विद्यागर हा ६१७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे विद्यागर हा दुसऱ्यांदा हा परीक्षा पास झाला आहे. अजिंक्य याने शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे अजिंक्य विद्यागर यांनी दीड वर्षापूर्वी म्हटले होते. आज अजिंक्य यांनी दुसऱ्यांदा यश मिळवत बार्शीत इतिहास घडवला आहे.

शिवाय कळंबवाडी येथील निखिल उर्फ जयजीतसिंह जरीचंद उमाप हा देशात ७५९ वा आला आहे. त्याने पुणे व मुंबई येथे खासगी कंपनीत चार वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या कालावधीत २०१९ ला केंद्रीय परीक्षेत गुप्तचर विभागात नोकरी लागली. ही नोकरी करत अभ्यास सुरू ठेवला होता. तीन वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली मात्र यशाने हुलकावणी दिली. मात्र काहीही करून आपण यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवायचे ही जिद्द कायम होती. त्याच्या जिद्दीला यश मिळाले. तर अजिंक्य विद्यागर हा ६१७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे विद्यागर हा दुसऱ्यांदा हा परीक्षा पास झाला आहे. अजिंक्य याने शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे अजिंक्य विद्यागर यांनी दीड वर्षापूर्वी म्हटले होते. आज अजिंक्य यांनी दुसऱ्यांदा यश मिळवत बार्शीत इतिहास घडवला आहे.

: सोलापूर जिल्ह्यातून आनंद व्यक्त

 तसेच माळशिरस तालुक्यातील वाघोली येथील एका शेतकऱ्याचा मुलगा सागर भारत मिसाळ याने ३५४ क्रमांकाने पास होऊन यश संपादन केले आहे. यापूर्वी सागर मिसाळ यांनी २०२० मध्येही २०४ क्रमांकाने यश मिळवून उत्तराखंड या राज्यात आयएएस पदावर त्यांची निवड झाली होती. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न मनी बाळगून दुसऱ्यांदा प्रयत्न केले. त्यात त्यांनी यश प्राप्त केले आहे. हा दुसरा प्रयत्न केला होता त्यातही यश प्राप्त केले. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील शिंदेवाडी (ता. माळशिरस) गावातील शेतकरी पांडुरंग जाधव यांचा मुलगा शुभम जाधव याने ४४५ क्रमांकाने यश मिळविले आहे. त्याने आतापर्यंत पाचवेळा ही परीक्षा दिली. पाचव्यावेळी त्याला यश मिळाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0