Unorganized Workers |Sunil Shinde | असंघटीत कामगारांच्या मागे कॉंग्रेस पक्ष ठामपणे उभा | सुनील शिंदे
Unorganized Workers – (The Karbhari News Service) – बीजेपीने जाहीर केलेला कामगारांसाठीचा जाहीरनामा हा पूर्ण फसवा आहे. असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा जो आहे त्यामध्ये वाढ करू असे भाजपने म्हटले आहे. वास्तविक पाहता असंघटीत कामगारांचा कुठेही किमान वेतन कायद्यात अंतर्भाव केलेला नाही. ते कामगार कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत आणि त्याबरोबरच कामगारांचे जे तंत्राटीकरण, खाजगीकरण झाले आहे त्यामध्ये कुठेही वेतनवाढीचा ठोस प्रस्ताव भाजपने दिलेला नाही. असंघटीत कामगारांसाठी कोणताही कायदा करण्याचे आश्वासन भाजपने दिलेले नाही. त्यामुळे, बीजेपीचे सरकार पूर्णपणे कामगारद्रोही असल्याचे आणि त्यांच्या जाहीरनाम्यातूनही कामगारविरोध असल्याचे स्पष्ट होते. अशी खरमरीत टीका असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केली. (Pune Congress)
आज कॉंग्रेस भवन येथे पुणे शहरातील असंघटीत कामगारांचा मेळावा घेण्यात आला त्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते सुनील शिंदे हे होते. त्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार नेते व कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये घरेलू कामगार त्याबरोबरच ओला, उबेर, स्वीग्गी, झोमॅटो या गिगवर्कर तसेच बांधकाम मजूर, रिक्षाचालक उपस्थित होते. यासार्वांसाठी न्याययोजनेद्वारे केंद्रीय कॉंग्रेसचे नेते आणि अध्यक्ष खर्गे साहेबांनी कॉंग्रेसचा जो जाहीरनामा सादर केला आहे त्यामध्ये सामाजिक सुरक्षितता कायदा देण्याचे आश्वासन केले. त्याचा अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच घरेलू कामगारांचे मंडळ जे युती सरकारने बंद केले आणि जे कॉंग्रेस सरकारने चालू केले होते ते मंडळ चालू करण्याचा पुढाकार घेण्याचे आश्वासन कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज दिले. त्याच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
जे कामगार असंघटीत क्षेत्रात येतात त्यांना कोणताच कामगार कायदा लागू होत नाही. आणि अशा कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना आणि त्यांना कामगारांच्या कायद्याच्या कक्षेत आणण्याचे काम हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात केले आहे, असे सुनील शिंदे यांनी सांगितले. किंबहुना त्यांच्यासाठी ठोस कायदा करण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. त्याच्या अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आला. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये १०० हून अधिक कोपरासभा घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्या मेळाव्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील घरेलू कामगार, बांधकाम कामगार, हॉस्पिटल मधील कामगार, कारखान्यांमधील कामगार, अशा सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी या सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रत्येक बैठकीला शेकडो उपस्थित राहतील. आणि त्यामध्ये कॉंग्रेसचा जाहीरनामा त्याबरोबरच प्रचाराचे साहित्य वाटप करण्याचे काम देखील असंघटीत कामगार कॉंग्रेसमार्फत केले जाईल. असे सुनील शिंदे यांनी सांगितले.
यावेळी पुणे शहर असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष एस.के.पडसे, असंघटीत कामगार कॉंग्रेस राज्याचे ऑर्गनायझरयासीन शेख, असंघटीत कामगार कॉंग्रेस राज्याचे सरचिटणीस राहुल गोंजारी, पुणे शहरातील कामगार नेते आणि राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण तसेच आबा जगताप, डोंगरे, महापालिकेतील तंत्राटी कामगारांचे विविध भागातील नेते हे सर्व उपस्थित होते.