Girish Gurnani : कोथरूड राष्ट्रवादी युवकचा अनोखा सामाजिक उपक्रम : विशेष मुलांसाठी रंगपंचमी, होळी कार्यक्रमाचे आयोजन 

Homeपुणेsocial

Girish Gurnani : कोथरूड राष्ट्रवादी युवकचा अनोखा सामाजिक उपक्रम : विशेष मुलांसाठी रंगपंचमी, होळी कार्यक्रमाचे आयोजन 

Ganesh Kumar Mule Mar 23, 2022 7:04 AM

NCP Youth | छत्रपतीं संदर्भातील वक्तव्यावरून युवक राष्ट्रवादीची कोथरूड मध्ये राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी
Girish Gurnani | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ममता फाउंडेशनमध्ये रक्षाबंधन साजरा
NCP Youth | Girish Gurnani | राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गुजरात कॉलनी,वनाज कॉर्नर परिसरामध्ये  शाखा उद्घाटन

कोथरूड राष्ट्रवादी युवकचा अनोखा सामाजिक उपक्रम

: विशेष मुलांसाठी रंगपंचमी, होळी कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : रंगपंचमी,होळीच्या निमित्ताने बावधन स्थित अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प येथे कोथरूड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने विशेष कार्यक्रम राबवण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष  गिरीश गुरनानी व त्याच्या सहकाऱ्यांनी या विशेष मुलांसाठी नाश्त्याचे आयोजन केले व त्यांच्यासोबत रंगपंचमीचे अनेक रंग उधळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. चिमुकल्यांसोबत हे युवा कार्यकर्तेही मग्न होऊन सण साजरा करत असल्याचे या वेळी बघायला मिळाले.

युवाशक्ती च्या सहाय्याने आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या सर्व युवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मदतीने त्यांचे अध्यक्ष गिरीश गुरनानी वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करत असतात. समाजसेवेचे अविरत व्रत या सर्व युवांनी घेतले असल्याचे या सर्व कार्यक्रमांमधून दिसून येते. या मुलांच्या निरागस आनंदात हरवून गेल्याचे आणि त्यांच्या हर्शोल्हासाने होळी या सणाचा उत्साह द्विगुणित झाल्याचे गुरनानी यांनी या प्रसंगी सांगितले.

सदर कार्यक्रमास कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक चे अमोल गायकवाड, सुनील हरळे, ओमकार शिंदे, सौरभ ससाणे, ऋषिकेश शिंदे आदि कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.