Union Budget 2025 | सर्वंकष असा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प | केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया

HomeBreaking News

Union Budget 2025 | सर्वंकष असा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प | केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया

Ganesh Kumar Mule Feb 01, 2025 8:30 PM

Mahayuti Pune | महायुतीची पुणे जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न
PMPML Cashless Payment | पीएमपीएमएलने मेट्रो सोबत यंत्रणा कनेक्ट करावी | पालकमंत्री चंद्रकांत पाटील 
Pune Metro Passenger | अनंत चतुर्दशीला दीड लाखापेक्षा जास्त पुणेकरांचा मेट्रोने प्रवास

Union Budget 2025 | सर्वंकष असा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प | केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया

Budget 2025 – (The Karbhari news Service) – देशातील मध्यमवर्गाला १२ लाख पर्यंतची करमुक्ततता, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून ५ लाख तसेच एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने’चा फायदा, देशात हरित ऊर्जा, ईव्ही तसेच एआय तंत्रज्ञानाला मोठी चालना, डाळींच्या बाबत देश स्वयंपूर्ण करणे तसेच आगामी पाच वर्षात देशात वैद्यकीय शिक्षणाच्या ७५००० वाढीव जागा अशा देशातील प्रत्येक घटकाला भरभरून देत विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने घेवून जाणारा सर्वंकष असा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. असे माधुरी मिसाळ यांनी म्हटले आहे.

——–
विकसित भारताची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प !- चंद्रकांतदादा पाटील

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प क्रांतिकारक अशा स्वरूपाचा आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन केंद्राने मध्यमवर्गी्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय सुविधा, पायाभूत सुविधांचे प्रकल्प, संरक्षण, शिक्षण अशा विविध क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतूद भारताला प्रगतीची नवी दारे उघडून देणारी आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतूदी मांडण्यात आल्या आहेत. आयआयटीच्या 6 हजार 500 जागा आणि वैद्यकीय महाविद्यालयात 75 हजार जागा वाढविण्याचा निर्णय ही तरुणांसाठी मोठी सुसंधी आहे. महिला, तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प “2047 विकसित भारत” हे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने टाकलेले ठाम पाऊल आहे. अशा सर्वस्पर्शी अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांचे मनःपूर्वक धन्यवाद!