Umerga Lohara Vidhan Sabha Election | जर खऱ्या हक्कदारावर केला स्वामींचा वार, तर चौगुले होतील का हद्दपार! का तिसरीच शक्ती पुढे येणार?

HomeBreaking NewsPolitical

Umerga Lohara Vidhan Sabha Election | जर खऱ्या हक्कदारावर केला स्वामींचा वार, तर चौगुले होतील का हद्दपार! का तिसरीच शक्ती पुढे येणार?

गणेश मुळे Jul 14, 2024 10:45 AM

BJP Maharashtra Adhiveshan | महायुतीचा निर्णय होईल तेव्हा होईल, मात्र पक्ष नेतृत्वावर श्रद्धा ठेऊन काम करा | आपण विधानसभेत 200 च्या वर जागा जिंकू | चंद्रशेखर बावनकुळे
Voting Certificate | मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे | मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम
Cantonment Vidhansabha Election | सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची साथ महायुतील मिळेल; सुनील कांबळे यांनी व्यक्त केला विश्वास | पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीची मातृशक्तीची महाबैठक संपन्न

Umerga Lohara Vidhan Sabha Election | जर खऱ्या हक्कदारावर केला स्वामींचा वार, तर चौगुले होतील का हद्दपार! का तिसरीच शक्ती पुढे येणार?

Vidhansabha Election 2024 -(The Karbhari News Service) – उमरगा लोहारा विधानसभेचे वारे वाहू लागताच दिवसेंदिवस वातावरण गरम होत आहे. उमरगा लोहारा तालुका अविकसित तालुका असला तरी राजकीय दृष्ट्या अतिशय सजग तालुका म्हणून ओळखला जातो. या विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जातीची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने हा मतदारसंघ आरक्षित झाला. (MLA Dyanraj Chougule)


2009 पासून या मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले करत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून या तालुक्यातील नेतृत्व करत असताना बऱ्याच घडामोडी मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. विद्यमान आमदाराच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला असला तरी विरोधकांनी प्रभावीपणे आपली विरोधाची भूमिका कधी मांडलेली नाही.  नव्हे तर ते जाणीवपूर्वक आणि अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे त्यांचे सोबतीस होते.  हे गेल्या पंधरा वर्षापासून तालुक्याने अनुभवले आहे.

परंतु; गेल्या अडीच वर्षापूर्वी मूळ शिवसेनेचे बंडखोरीच्या माध्यमातून दोन तुकडे झाले.  त्या बंडखोर गटामध्ये ज्यांना महाराष्ट्राने गद्दार म्हणून ओळखले या गटामध्ये आमदार चौगुले सामील झाले.
हाच रोष हाच राग आणि तिरस्कार चीड निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनामध्ये ठासून भरलेले आहे. याचा उद्रेक गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला. कारण गेल्या लोकसभेची निवडणूक ही कुठल्याही मुद्द्यावर लढली नसून राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने ७0 टक्के जनता संविधानाच्या माध्यमातून लाभ घेणारा वर्ग असल्याकारणाने आणि संविधानाचे रक्षणार्थ बचावासाठी उत्स्फूर्तपणे जनतेने या निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवून ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती.

त्याचा परिणाम सुसाट वेगाने जाणारे अहंकाराने ओतपोत भरलेल्या भाजपाचे सरकार काठावर पास झाले. आणि मजबूत विरोधक म्हणून इंडिया आघाडीत्यांच्या बोकांडी बसले जनतेला हेच अपेक्षित होतं.  म्हणून या उमरगा लोहारा तालुक्याने जवळपास 43 हजाराची लीड ही विद्यमान खासदारांना दिली.  परंतु याचा परिणाम असा झाला की उमरगा लोहारा विधानसभेच्या माध्यमातून बरीच इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून उतावीळपणे विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत राजकारण्यांनी संभ्रमित व्हावे असे वातावरण या तालुक्यामध्ये निर्माण होताना दिसते.

कारण गेल्या पंधरा वर्षापासून विद्यमान आमदार नेतृत्व करत असताना प्रचंड मोठा विकास निधी आणला असे जरी असले तरी त्या निधीच्या माध्यमातून केली गेलेली कामे कोणत्या दर्जाचे आहेत. याकडे मात्र डोळे झाक केली गेली आहे. सामाजिक चळवळीतील विचारी मंडळी उदा, एडवोकेट शितल चव्हाण सारखेंनीं आवाज उठवला.  परंतु त्या आवाजाला मोठ्या प्रमाणात ताकद या तालुक्यांतील जनतेकडून मिळाली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल आणि हीच चौगुले यांच्या जमेची बाजू आहे.

परंतु अशाच काही चळवळीतील कर्त्या लोकांकडून आज चौगुले विरुद्ध मोट बांधण्याचा प्रकार सुरू असताना प्रमुख राजकीय पक्षांकडून अशांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे गरजेचे आहे. आणि हे लढणारे सैनिक आहेत हे जाणून असावं. परंतु तसं होताना दिसत नाही. उलट पक्षी जातीय समीकरणे मांडत असतानाच तालुक्याच्या बहुसंख्यांक समाज घटकांचा विचार करून तालुक्यातील राजकारणात त्यांनी उमेदवार ठरवावा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवत असताना सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन निवडीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली जाणार आहे आणि म्हणून उमेदवार ठरवण्याचा अधिकार जरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा असला तरी त्या निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट, आणि इतर सामाजिक संघटना यांना देखील विश्वासात घेऊन उमेदवार ठरवावा लागणार आहे.

मात्र असे होताना दिसत नाही. काही मंडळींच्या मते लातूर पॅटर्न उमरगा मध्ये राबवावा का अशी आशा बाळगून चुकीचे गणित मांडून हा निर्णय घेऊ पाहत आहेत. यामध्ये दोन्ही बाजूनीं काय साध्य होते का? असाही प्रयत्न होताना दिसतोय अशी चर्चा तालुक्यामध्ये आहे. कारण चौगुले सारखा बलाढ्य श्रीमंत आणि ताकतवर उमेदवार हा समोर असताना त्यांना शह देण्यासाठी तशाच सामाजिक संख्येने बलाढ्य अभ्यास आणि आक्रमक चळवळीचे नाळ असलेला कार्यकर्ताच त्यांना शह देऊ शकतो. हे वास्तविक असताना उपेक्षिताचा जिन न जगलेल्या, अस्पृश्यता काय असते याची जाणीव नसलेल्या प्रतिष्ठित स्पृश्य जातींना मतदानाची टक्केवारी मिळेल का? या चुकीच्या संकल्पनेतून स्वामी हा घटक मुद्दामहून पुढे घेऊन येत आहेत. याचा अर्थच असा आहे की तालुक्यामध्ये ज्या मुद्द्यांवर यापूर्वी निवडणुका लढल्या तो जातीतेचा मुद्दा या तालुक्याच्या माथ्याला कलंक आहे. तो कलंक पुसून टाकण्याचे सामर्थ्य ती संधी आज या विधानसभा मतदारसंघाला प्राप्त झाली असताना त्या संधीचं सोनं करून विरोधक राजकीय दृष्ट्या संपवणं हे गणित मांडणे ऐवजी, पूर्वीच्याच जातीय मानसिकतेचा कलंक आणखी भडक करण्याची भूमिका म्हणजेच स्वामींची उमेदवारी का? असा प्रश्न तालुक्यातील सुजान विचारी तसेच सबंध मागासवर्गीय वर्गातील समाज घटकांना पडलेला आहे.

कारण स्वामींची उमेदवारी म्हणजेच तालुक्यातील खऱ्या लाभधारक असणाऱ्या अनुसूचित जातीत शोषित आणि अस्पृश्यघटकाचे जीवन जगणाऱ्या उपेक्षित जातींच्या राजकीय हक्काची कुर्बानी देणारा असल्याकारणाने हा घटक केव्हाही आपली कुरबानी मान्य करणार नाही. तो प्रचंड मोठा घटक बंडाच्या पवित्रात असेल, आणि वेगळी ताकद निर्माण करू शकेल जोकी येणाऱ्या विधानसभेच्या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडी कडून इच्छुक असणारे चळवळीतील कार्यकर्ते अशोकराजे सरवदे, शिवसैनिक विलास हटकर , प्रा, संजय कांबळे, व काँग्रेसकडून विजय वाघमारे या सर्वांचा विचार केला असता आणि विधानसभेचा मागील पंधरा वर्षाचा पूर्व इतिहास पाहिला असताअशोकराजे सरवदे हे डॅशिंग निष्कलंक आणि अभ्यासू उमेदवार म्हणून सरस ठरत असल्याची चर्चा जनतेत आहे. म्हणून चौगुले यांच्या विरोधामध्ये तोडीस तोड उमेदवार म्हणून म्हणून महाविकास आघाडी कडून स्वामीं बाबत संभ्रमावस्थेत येऊन जर लातूर पॅटर्न उमरग्यात राबवण्याची तयारी होत असेल तर असा निर्णय हा केव्हाही कमजोर चुकीचा आणि महाविकास आघाडीच्या अपघाताचा ठरेल अशी चर्चा तालुक्यामध्ये आहे.

| लेखक – प्रताप होळीकर.
—-

(टीप – या लेखातील मतांशी संपादक सहमत असतील असे नाही.)