UAE News | दुबई मध्ये रंगला बालपण देगा देवा हा अनोखा उपक्रम | तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त संस्कृती मराठी मंडळाने आयोजित केला बालपण देगा देवा कार्यक्रम!

HomeBreaking News

UAE News | दुबई मध्ये रंगला बालपण देगा देवा हा अनोखा उपक्रम | तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त संस्कृती मराठी मंडळाने आयोजित केला बालपण देगा देवा कार्यक्रम!

Ganesh Kumar Mule Aug 26, 2024 9:20 PM

Dubai Ganesh Utsav | सातासमुद्रापार दुबईत यंदा प्रथमच सार्वजनिक गणेश उत्सव! | गणपती बाप्पाच्या आगमनासाठी दुबईकरांची जोरदार तयारी सुरु
Ram Navami 2024 In Dubai | सातासमुद्रा पार दुबईत राम नामाचा गजर आणि जयघोष!
Sanskriti Marathi Mandal | Dubai | खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला दुबईमध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

UAE News | दुबई मध्ये रंगला बालपण देगा देवा हा अनोखा उपक्रम | तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त संस्कृती मराठी मंडळाने आयोजित केला बालपण देगा देवा कार्यक्रम!

 

Marathi Sanskriti Mandai Dubai – (The Karbhari News Service) – तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त संस्कृती मराठी मंडळाने आयोजित केलेला बालपण देगा देवा आगळावेगळा कार्यक्रम दुबईस्थित नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तसेच UAE च्या मराठी मुली यांच्या सौजन्याने अतिशय यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन करुन तसेच दुबई मधील व्यावसायिक पूजा रावखंडे, प्रशांत शिंपी, संदिप शिंपी, शिवराज हीतनल्ली आणि चंद्रहास रहाटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाली.

बालपण देगा देवा या अनोख्या संकल्पनेतून दुबई मधील नागरिकांनी  लहानपणचे खेळ जे आता काळाआड गेले आहेत ते आपण मोठे झाल्यावर देखील खेळू शकतो हे दाखवून दिले. कबड्डी, खो खो, लंगडी, आंधळी कोशिंबीर, कांदाफोड, विषामृत, लगोरी आणि असेच इतर खेळांचे उत्तम आयोजन मंडळाने केले. सर्व नागरिकांनी अगदी आपण लहान आहोत असे समजून खेळांचा आनंद घेतला.

या कार्यक्रमासाठी स्पेस वर्ल्ड कॅपिटल, पिकनिक वर्ल्ड, वर्ल्ड टूर, कँजेन वॉटर, सीबीडी बँक, विश्वा टेक्निकल सर्विसेस, ग्रीन प्रेहाब, केकालॉजी, स्वामिनी ढोल ताशा पथक, श्रीमंत ढोल ताशा पथक तसेच सीजीआर फीनटिम प्रायोजक म्हणुन लाभले. तसेच कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रितेश पठारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यामागे संस्कृती मराठी मंडळाच्या सर्व सभासदांचा हातभार लागला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0