दुपारी १२ ते ४ पुणे शहरातील सिग्नल बंद ठेवा
: मनसे ची वाहतूक पोलिसांकडे मागणी
पुणे : शहरातील सर्व गरजेचे मुख्य चौक सोडुन सर्व वाहतूक सिग्नल दुपारी १२ ते ४ बंद करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक शाखेकडे केली आहे. याबाबत मनसे चे शहर उपाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी पत्र दिले आहे.
वाहतूक पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरातील उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. ४०-४३ सेल्सिअस च्या पेक्षा जास्त दिवसें दिवस तापमानात वाढ होत चालली आहे. पुणेकरांना सिग्नल वर कडक उन्हाचे चटके सहन करत थांबावे लागत आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांना उष्णतेमुळे घोळणा फुटणे, त्वचा रोग, डोकेदुखी अशक्तपणा, चक्कर येणे, शरीरातील पाण्याची कमतरता होणे. असे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. आपणांस विनंती आहे पुणे शहरातील सर्व वाहतूक सिग्नल दुपारी १२ ते ४ बंद ठेवण्यात यावेत.
COMMENTS