Dharur Ratna Award | वृक्षमित्र अरुण पवार यांचा ‘धारूररत्न पुरस्कारा’ने गौरव
Dharur Ratna Award | सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल वृक्षमित्र अरुण पवार (Tree Friend Arun Pawar) यांचा धारूर ग्रामस्थ आणि ज्ञानलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था नांदेड यांच्या वतीने ‘धारूररत्न पुरस्कार’ (Dharur Ratna Award) देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. (Dharur Ratna Award)
यावेळी प्रा. रत्नाकर खांडेकर, डॉ. श्रीराम नरवडे, सरपंच बालाजी पवार, समाजसेवक गणेश गुरव, प्रा. अण्णा गरड, मधुकर कदम, जयसिंग कदम पाटील, वृक्षमित्र सोमनाथ कोरे, श्री श्री रविशंकर यांचे शिष्य प्रशांत संगपाळ, जगदीश पाटील, तुषार पवार, श्रीराम कदम, तानाजी खांडेकर, विशाल पवार, महेश गुरव, बालाजी गुरव, कुलदीप पवार, बालाजी पाटील, अभिजित कामटे, बाळासाहेब कोरे, प्रमोद पवार, महेश गडदे आदी उपस्थित होते.
वैभव कदम यानी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल, धारूर गावात प्रथम महिला डॉक्टर होण्याचा मान डॉ. श्वेता शिंदे यांनी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच दहावीमध्ये प्रथम, द्वितीय, त्रितीय क्रमांक प्राप्त केलेल्या अमृता गुरव, आर्या शिंदे, सई सुर्यवंशी, पायल कोरे या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन वृक्षमित्र अरूण पवार व डॉ. श्रीराम नरवडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. श्रीराम नरवडे यांनी वृक्षमित्र अरुण पवार यांच्या कार्याचा गौरव केला. पवार यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत दहावीनंतर पिंपरी चिंचवड शहरात मिळेल ते काम करून बांधकाम व्यवसायात नाव कमावले. व्यवसाय करताना समाजातील उपेक्षित घटकांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला. तसेच त्यांनी धारूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे बांधकाम केले, गावात स्वागत कमान बांधली, तसेच दुष्काळी परिस्थितीत गावात पाण्याची सोय, जनावरांना चारा, विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा पुरविली. तसेच हजारो वृक्ष लागवड करून ती जोपासली आहेत, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक दयानंद शिंदे यांनी, सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश कामटे यांनी, तर आभार गणेश गुरव यांनी मानले.
——
News Title | Tree friend Arun Pawar honored with ‘Dharur Ratna Award’