Transfer | PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासनाकडून प्रशासकीय सोयीसाठी बदल्या |  कर्मचाऱ्यांनी मात्र अन्याय झाल्याची व्यक्त केली भावना 

HomeBreaking Newsपुणे

Transfer | PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासनाकडून प्रशासकीय सोयीसाठी बदल्या | कर्मचाऱ्यांनी मात्र अन्याय झाल्याची व्यक्त केली भावना 

Ganesh Kumar Mule Jun 25, 2023 11:53 AM

PMC DI Ashish Supnar | पुणे महापालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक आशिष सुपनार यांना महात्मा फुले कार्यगौरव पुरस्कार
Abdul Sattar Vs NCP | Pune | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो आंदोलन”
Pune Metro Service | ऑगस्ट महिन्यामध्ये पुणे मेट्रो दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ

Transfer | PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासनाकडून प्रशासकीय सोयीसाठी बदल्या |  कर्मचाऱ्यांनी मात्र अन्याय झाल्याची व्यक्त केली भावना

Transfer | PMC Pune Employees | (Author – Ganesh Mule) | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांच्या स्तरावर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या (PMC Employees Transfer) करण्यात आल्या आहेत. यामध्ये अधिक्षक (Superintendent), उप अधिक्षक (Deputy Superintendent) तसेच वरिष्ठ लिपिकांचा (Senior Clerk) समावेश आहे. प्रशासकीय सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तर काही कर्मचाऱ्यांच्या 2 महिन्यापूर्वी बदल्या केल्या असताना पुन्हा त्यांच्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे कर्मचारी अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आहेत. तसेच प्रशासनाने पारदर्शक बदल्यांचा फक्त फार्स तयार केला होता कि काय, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. (Transfer | PMC Pune Employees)

दोन महिन्यांपूर्वी करण्यात आल्या होत्या बदल्या

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनंतर महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या 20% बदल्या करण्यात आल्या होत्या. दोन महिन्यापूर्वी या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी महापालिका प्रशासनाकडून समुपदेशन करण्यात आले होते. त्यानुसार बहुतांशी कर्मचाऱ्यांना त्यांना हव्या त्या ठिकाणी बदली मिळाली होती. मात्र आता ज्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्या अचानक करण्यात आल्या आहेत. यामध्ये 21 उप अधिक्षक, 22 वरिष्ठ लिपिक व लिपिक टंकलेखक आणि 8 अधीक्षक यांचा समावेश आहे. यामध्ये 2 महिन्यापूर्वी बदल्या करूनही पुन्हा लगेच बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. (Pune Municipal Corporation News)

– कर्मचाऱ्यांचे काय आहेत आरोप?

दरम्यान अचानक केलेल्या या बदल्यामुळे काही कर्मचारी मात्र कमालीचे संतप्त झाले आहेत. याबाबत आमचे सुमपदेशन झाले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच एकदा बदली केल्यानंतर पुन्हा किमान तीन वर्ष बदली करता येत नाही, असा नियम असताना देखील तो डावलला गेला, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. मागच्या वेळी बदल्या करून बदल्यात पारदर्शकता आहे, अशी प्रशासनाने पाठ थोपटून घेतली होती. मग दोन महिन्याने त्याच कर्मचाऱ्यांच्या पुन्हा बदल्या केल्या, म्हणजे प्रशासनाचे नियोजन चुकले होते का? पारदर्शकतेचा बुरखा फाटला का? असे प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केले आहेत. (PMC Pune News)

२०१७ मधे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील  सेवकांची सन २०१७ पासून एकाच खात्यात नेमणूक आहे. ११ गावांतील बहुतांश सेवक टॅक्स विभागातच काम करीत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही का, असाही मुद्दा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. तसेच ज्यांना एकाच खात्यात ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांचं काय? जे लोक टॅक्स, बांधकाम, ऑडिट विभागात कामाला आहेत त्यांना काहीच वावग नाही का? या खात्यातील २०% बदली झालेले सेवक हे निवडून काढल्यासारखे वाटतात. त्यांच्या आधीपासूनचे सेवक अजूनही त्याच खात्यांमध्ये आहेत. असाही मुद्दा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. (PMC Pune Employees)

| महापालिका प्रशासन काय म्हणते?

नुकत्याच करण्यात आलेल्या बदल्याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले कि, प्रशासकीय सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त यांच्या स्तरावर या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही क्षेत्रीय कार्यालयामध्ये अधिक्षक आणि उप अधिक्षक यांची आवश्यकता होती, त्यामुळे अशा आवश्यक कर्मचाऱ्यांची बदली तिथे करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वी बदली होऊन पुन्हा बदली झालेले कर्मचारी अवघे 6 च आहेत. यातील बऱ्यापैकी लोक हे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे कामाला होते. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले कि या कर्मचाऱ्यांची आम्हांला आवश्यकता नाही, म्हणून त्यांना बदलण्यात आले आहे. बाकी सर्व कर्मचारी बदली पात्र आहेत. म्हणून या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच अधिक्षक आणि उप अधिक्षक यांची संख्या मुळात कमी असते. त्यांना 20% चा नियम लावता येत नाही. त्यामुळे मुख्य सभेचा कुठला निर्णय नसला तरी त्यांच्या बदल्या कशा करायच्या, याचा निर्णय आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांच्या स्तरावर घेतला जाऊ शकतो. असे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Employees Transfer)
News Title | Transfer | PMC Pune Employees | Transfers for administrative convenience from the Pune Municipal Administration However, some employees expressed their feelings of injustice