नगरसचिव विभागाकडील 36 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
: अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे आदेश
पुणे : महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडील सुमारे 36 कर्मचाऱ्यांच्या बदल्या विभिन्न विभागात करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत. मात्र काही कर्मचाऱ्यांनी या बदल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांना वेतन सध्याच्या वेतनाच्या खात्याकडून अदा केले जाईल. फक्त काम दुसऱ्या विभागात करावे लागणार आहे. बदली केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समिती लेखनिक, लिपिक टंकलेखक, शिपाई, उपाधीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा पदांचा समावेश आहे.
मात्र या बदल्यावरून काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बदल्यामध्ये भेदभाव केला असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार देखील केली आहे. अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन या कर्मचाऱ्यांना दिले आहे.
: कंत्राटी सेवकांना कमी करणार
दरम्यान काही महिन्यापूर्वी नगरसचिव विभागाकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते. मात्र विभागाकडील कामाचा बोजा कमी झाल्याने आता त्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. नगरसचिव विभागाने याबाबत सामान्य प्रशासनाकडे प्रस्ताव देखील दिला आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
COMMENTS