MLA Sunil Tingare : Porwal Road: धानोरीतील पोरवाल रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार! : आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

HomeपुणेPMC

MLA Sunil Tingare : Porwal Road: धानोरीतील पोरवाल रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार! : आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Ganesh Kumar Mule Mar 07, 2022 1:22 PM

Yerwada, Kalas, Dhanori : MLA Sunil Tingre : पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा : आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश
MLA Sunil Tingre | रस्त्यांची दूरावस्था दूर करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा : सुनील टिंगरे
MLA Sunil Tingre | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

धानोरीतील पोरवाल रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार!

: आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

: 24 मीटर रुंदीच्या नविन रस्त्यास महापालिकेची मंजुरी

पुणे :  धानोरी येथील पोरवाल रस्त्याला समातंर असा 24 मीटर रुंदीचा नविन पर्यायी रस्ता आखण्यास महापालिकेच्या शहर सुधारणा समितीबरोबर महापालिकेच्या मुख्य सभेतही मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर या रखडलेल्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पोरवाल रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न आता सुटणार आहे.
       पोरवाल रस्ता परिसरात  गेल्या काही वर्षांत गेल्या काही वर्षांत 500 पेक्षा अधिक सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. या भागाला जाणारा पोरवाल रस्ता हा एकमेव पर्याय असल्याने वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी या रस्त्याला पर्याय म्हणून 205 अंतर्गत सुधारित रस्त्याची आखणी करण्यात यावी आणि रस्त्याचे काम मार्गी लागावे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने आमदार टिंगरे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने धानोरी स. न. 12, 14, 15 व 17 मधून 24 मीटर रुंदीचा रस्ता कलम 205 अन्वये रस्ता आखण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लगेचच मुख्यसभेत हा प्रस्ताव दाखल करून घेऊन त्यास मंजुरी देण्यात आल्याने आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा मार्ग मोक़ळा झाला आहे.
—————————
विधानसभा निवडणूकीत या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अधिवेशन सुरू असतानाही मी शहर सुधारणा समिती आणि मुख्यसभेला  स्वत: उपस्थित राहून हा प्रस्ताव मंजुर करून घेत दिलेले आश्वासनपुर्ती केली आहे.
         सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.