महापालिकेचे तीन ‘सहायक आयुक्त’ होणार ‘उपायुक्त’
| विधी समिती समोर प्रस्ताव
समितीच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ‘उप आयुक्त’ वर्ग-१ (पे मेट्रिक्स S-२३ ६७७००-२०८७००) या पदावर ‘सहाय्यक आयुक्त’ वर्ग-१ या पदावरून पदोन्नतीने नेमणूक करणेसाठी तयार करावयाचे निवड यादी व प्रतिक्षा यादीसाठी दिनांक २७/१२/२०२२ रोजी पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली. मान्य आकृतीबंधानुसार उप आयुक्त’ वर्ग-१ या संवर्गातील एकूण १८ पदे मंजूर असून, ५०% प्रमाणे पदोन्नतीची एकूण ९ मंजूर पदे आहेत. शासनाचे नगर विकास विभाग यांचेमार्फत सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई कार्यालय यांचेकडून ‘उप आयुक्त’ वर्ग-१ या पदाचे पदोन्नतीच्या रोस्टरची तपासणी दि. २५/११/२०१६ रोजी झालेली आहे. त्यानुसार 3 पदे रिक्त राहत होती. या स्थितीनुसार सद्यस्थितीत उप आयुक्त पदाच्या २ रिक्त जागा उपलब्ध होत असून, संजय गावडे, उप आयुक्त यांच्या सेवानिवृत्तीनंतर दि.३१/०३/२०२३ पश्चात १ जागा रिक्त होणार आहे. सदर रिक्त जागांकरिता निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणेस पदोन्नती समितीने एकमताने शिफारस केली आहे. (Pune Municipal corporation)