ही पुण्याची राजकीय संस्कृती नाही | कसबा पोटनिवडणूक वरून प्रशांत जगताप यांनी स्वपक्षातील लोकांना सुनावले
पुणे | पुण्याच्या माजी महापौर आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांचे नुकतेच निधन झाले आहे. मात्र त्यांचा दशक्रिया विधी होण्या अगोदर राष्ट्रवादीतील (NCP) काही मंडळी आमदारकी साठी बाशिंग लावून बसले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (city president prashant jagtap) यांनी अशा कार्यकर्त्याना सुनावले आहे. ही पुण्याची संस्कृती (Punes culture) नाही. त्यामुळे या चर्चा बंद करा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.
मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधान सभा मतदार संघाची (kasaba constituency) जागा रिक्त झाली आहे. इथे पोट निवडणूक होणे अपेक्षित आहे. असे असले तरी त्यांचा दशक्रिया विधी होण्या अगोदर निवडणुकी बाबत चर्चा होऊ लागली आहे. काही पक्ष त्यांच्या घरातील उमेदवार बिनविरोध निवडून द्या म्हणतात. तर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे आव्हान दिले आहे. मात्र यावरून उलट सुलट चर्चना उधाण आले आहे. यावरून यामध्ये राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उडी घेतली आहे. जगताप यांनी स्वपक्षातील लोकांसोबत दुसऱ्या पक्षातील लोकांनाही सुनावले आहे. जगताप म्हणाले, मुक्ता टिळक यांना जाऊन काहीच दिवस झाले तर लगेच त्यांच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीची चर्चांना उधाण आले आहे. अशी पुण्याची राजकीय संस्कृती नाही. मी आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना याविषयी चर्चा न करण्याचे आदेश दिले आहेत. (kasaba constituency by election)