Agricultural University Vs PMC Pune | .. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा!

HomeBreaking Newsपुणे

Agricultural University Vs PMC Pune | .. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा!

Ganesh Kumar Mule Dec 01, 2022 2:01 PM

Congress | Pune | मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | पुणे काँग्रेसची टीका
PMC Election 2022 | प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
President | MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

.. म्हणून कृषी विद्यापीठाने पुणे महापालिकेला दिला कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा

पुणे | महापालिकेकडून (PMC Pune) सांगवी-बोपोडी जोड रस्त्याचे (Sangvi-Bopodi Joint Road) काम केले जात आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (Mahatma Phule Agricultural University) महापालिकेला जमीन हस्तांतरित केली आहे. मात्र रस्त्याचे काम करत असताना अटी शर्तीचा भंग होत असल्याची तक्रार कृषी विद्यापीठाने केली आहे.  रस्त्याचे काम थांबवण्याची मागणी विद्यापीठाने केली आहे. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा विद्यापीठाकडून देण्यात आला आहे. (Pune Municipal corporation)

कृषी विद्यापीठाने महापालिकेला दिलेल्या पत्रानुसार सांगवी-बोपोडी जोड रस्त्याच्या कामाला महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी अटी व शर्तीसह विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथील १.७५ हे. जमीन हस्तांतरित केलेली आहे. तथापि रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जात असताना विद्यापीठाने नेमून दिलेल्या कोणत्याही अटींची पूर्तता झाल्याची दिसून येत नाही. तसेच या अटींच्या पूर्ततेच्या बाबतीत अनेकवेळा लेखी व तोंडी सूचना पुणे महानगरपालिकेला देण्यात आल्या होत्या परंतु आपल्याकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. याकारणास्तव सदर चालू असलेल्या सांगवी-बोपोडी जोड रस्त्याच्या कामास त्वरित स्थगिती देण्यात येत आहे. तरी सदर रस्त्याचे काम त्वरित बंद करण्यात यावे. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.

यावर महापालिका काय भूमिका घेणार यावर लक्ष लागले आहे.