Women Reservation | PMC Election 2022 | हडपसर मतदार संघातून 20 महिला नगरसेवक होणार

HomeपुणेBreaking News

Women Reservation | PMC Election 2022 | हडपसर मतदार संघातून 20 महिला नगरसेवक होणार

Ganesh Kumar Mule May 31, 2022 11:33 AM

Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदान दिनानिमित्त पुण्यात दोन दिवस स्मृतिजागर, निर्भय मॉर्निंग वॉक, विवेक निर्धार मेळावा
Khadakwasla Dam | खडकवासला धरणाचे पाणी दूषित असल्याचे राज्य सरकारने देखील केले मान्य | पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
Government Schemes | सरकारच देणार आता सरकारी योजनांची माहिती! | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना

हडपसर मतदार संघातून 20 महिला नगरसेवक होणार

: त्याखालोखाल खडकवासला आणि पर्वती

हडपसर मतदार संघातून यंदा सर्वाधिक महिला सदस्य महापालिकेच्या सभागृहात दिसणार आहे. सुमारे 20 महिला नगरसेवक या मतदारसंघातून होतील. तर त्या पाठोपाठ खडकवासला आणि पर्वती विधानसभा मतदार संघातील महिलांना महापालिकेत जाण्याची सर्वाधिक संधी मिळणार आहे.

महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावे समाविष्ट झाली आहे. त्यामुळे या समाविष्ट गावांसह उपनगरामधील प्रभागांची संख्या वाढली आहे. पर्वती, हडपसर आणि खडकवासला या तीन मतदार संघातून सर्वाधिक प्रतिनिधी महापालिकेवर निवडून येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक महिलांना संधी देखील आरक्षणाच्या निमित्ताने मिळणार आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुका तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहेत. पुण्यात ५८ प्रभाग व १७३ सदस्य संख्या आहे. पन्नास टक्के महिला आरक्षणानुसार ८७ महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. ५८ प्रभागात प्रत्येकी एक जागा या नुसार ५८ जागा महिलांसाठी राखीव झाल्यानंतर उर्वरित २९ जागांसाठी महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी काढली. लॉटरी पद्धतीने काढण्यात आलेल्या २९ पैकी सर्वाधिक हडपसर विधानसभा मतदार संघातील महिलांना संधी मिळणार आहे. या मतदार संघातील दहा प्रभागांमध्ये दोन जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे.
त्यामुळे या मतदार संघातून वीस महिलांना नगरसेविका होण्याची संधी आहे.

दुसरा क्रमांक खडकवासला मतदार संघातील महिलांचा आहे. या मतदार संघातील सहा प्रभागांमध्ये दोन जागांवर महिलांचे आरक्षण आहे. त्या खालोखाल पर्वती विधानसभा मतदार संघातील पाच प्रभागांमध्ये दोन जागा महिलांसाठी आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात चार प्रभागात दोन महिलांचे आरक्षण आहे. कसबा विधानसभा मतदार संघात दोन प्रभागात, तर शिवाजीनगर, पुणे कॅन्टोमेन्ट आणि कोथरूड या मतदार संघातील प्रत्येकी एका प्रभागात दोन महिलांसाठी जागा राखीव आहेत.

दोन महिला सदस्यांचे आरक्षण पडलेले प्रभाग

टिंगरेनगर-संजय पार्क (२), लोहगाव वडगावशेरी (३), खराडी पूर्व -वाघोली (४), येरवडा (९), शिवाजीनगर-संगमवाडी (१०), शनिवार पेठ-नवीपेठ (१७), पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (२०), कोरेगाव पार्क-मुंढवा (२१), साडेसरानळी-आकाशवाणी (२३), मगरपट्टा-साधना विद्यालय (२४), हडपसर गावठाण- सातववाडी (२५), वानवडी गावठाण- वैदुवाडी (२६), घोरपडे पेठ उद्यान-महात्मा फुले मंडई (२९), भुसारी कॉलनी-बावधन खुर्द (३२), रामनगर-उत्तमनगर- शिवणे (३५), कर्वेनगर (३६), मार्केट यार्ड- महर्षीनगर (३९), बिबवेवाडी-गंगाधाम (४०), रामटेकडी-सैय्यदनगर (४२), वानवडी-कौसरबाग (४३), मोहमदवाडी-उरुळी देवाची (४६), कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी (४७), अप्पर-सुपर इंदिरानगर (४८), बालाजीनगर-शंकर महाराज मठ (४९), नांदेड सीटी-सनसिटी (५२), खडकवासला-नऱ्हे (५३), धनकवडी-आंबेगाव पठार (५५), चैतन्यनगर-भारती विद्यापीठ (५६), सुखसागरनगर-राजीव गांधीनगर (५७)