Unlock Theatre: 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहे 50% क्षमतेने सुरु राहणार : हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी

HomeपुणेBreaking News

Unlock Theatre: 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहे 50% क्षमतेने सुरु राहणार : हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी

Ganesh Kumar Mule Oct 08, 2021 1:28 PM

Exit polls | एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध
Khadakwasla Canal Advisory Committee | आज कालवा सल्लागार समितीची बैठक | पाणीकपात होण्याची शक्यता कमी
Pramod Nana Bhangire | पुण्यातील सर्वात भव्य धर्मवीर आनंद दिघे दहिहंडीचे आयोजन

22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहे 50% क्षमतेने सुरू होणार

: हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी-

: उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: पुण्यात 22 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सोमवारपासून हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल अशी माहिती पवार यांनी दिली.

पालकमंत्री पवार बोलताना म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील पर्यटन स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड वर्षांनंतर राज्यातील मंदीरे सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी गर्दी न करता सर्व नियम पाळून मंदीरात जा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.