Katraj Lake | PMC Pune | कात्रज तलावाची पाणी साठवण क्षमता 1 कोटी लिटरने  वाढली

HomeBreaking Newsपुणे

Katraj Lake | PMC Pune | कात्रज तलावाची पाणी साठवण क्षमता 1 कोटी लिटरने वाढली

Ganesh Kumar Mule Jul 06, 2023 12:58 PM

Rajeev Gandhi Zoo : एका दिवसात तब्बल १२ हजार पर्यटकांची प्राणिसंग्रहालयाला भेट
Katraj Zoo Online Ticket | राजीव गांधी प्राणिसंग्रहालय | 10 दिवसांत 10 हजार लोकांनी ऑनलाईन तिकीट सेवेचा घेतला लाभ | महापालिकेला 3 लाखांहून अधिक उत्पन्न
Now there is no need to stand in queue for tickets in Katraj Zoo | Book tickets online from home

Katraj Lake | PMC Pune | कात्रज तलावाची पाणी साठवण क्षमता 1 कोटी लिटरने  वाढली

| 10 हजार घन मीटर गाळ काढण्यात आला

Katraj Lake | PMC Pune | पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) राजीव गांधी प्राणी संग्राहलय (Katraj Zoo) येथील ऐतिहासिक तलावामध्ये (Katraj Lake) जमा झालेले सांडपाणी व गाळ काढण्यात आला आहे. तलावातील 10 हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता 1 कोटी लिटरने वाढली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Katraj Lake | PMC Pune)
प्रशासनाच्या माहितीनुसार डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) (Additional Commissioner Dr Kunal Khemnar) यांनी दिलेल्या आदेशानुसार मलनि:सारण देखभाल व दुरूस्ती विभाग कडून  बरीच कामे करण्यात आलेली आहेत. (Pune Municipal Corporation News)

• तलावातील अस्तित्वातील आयफन व्यतिरिक्त दोन सायफन नव्याने बसवून कार्यान्वित करण्यात आले आहे. कात्रज तलावाच्या परिसरातील नाल्यांचे ड्रोनच्या सहाय्याने सर्व्हेक्षण करून घेण्यात आलेले आहे.
• सदर सर्व्हेच्या निरीक्षणानुसार तलावा मध्ये नाल्याच्या माध्यमातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी नव्याने ड्रेनेज लाईन विकसित करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे साठी २ एम एल डी क्षमतेचे एस टी पी बांधण्याचे काम सुरु आहे.
• विद्युत विभागा मार्फत मडपंपचे खरीदीची निविदा प्रक्रिया सुरु आहे. सदर ठिकाणी पंप बसवून कार्यान्वित करून तलावा मधील पाण्याची पातळी पावसाळ्यामध्ये नियंत्रित करता येईल
• व्हेईकल डेपो कडून प्राप्त झालेल्या जेसीबी व डम्परच्या सहाय्याने आजमितीस तलावातील सुमारे १०,००० घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे तलावाची पाण्याची साठवण क्षमता १ कोटी लिटरने वाढविण्यात आलेली आहे. (PMC Pune News)
——-
News Title | The water storage capacity of Katraj lake increased by 1 crore litres
 |  10 thousand cubic meters of sediment was removed