बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ यांनी मानले जाहीर आभार
: प्रलंबित रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना दिलासा
पुणे : सुस येथील वाढती लोकसंख्या आणि जपाट्याने वाढत असलेली वस्ती , गृह प्रकल्प यामुळे सुस गावातील रस्ता नेहमीच वाहतूक कोंडीचा विषय ठरलेला असतो त्यात सुस गावातील स्मशानभूमी जवळील अरुंद रस्त्यामुळे येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना रहदारीच्या त्रासाला मोठ्याप्रमाणात सामोरे जावे लागत आहे , याठिकाणी अनेक वेळा अपघात होतात तसेच नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. मात्र नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने रस्त्याची समस्या सोडवली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गावातील लोकांनी चांदेरे यांचे जाहीर आभार मानले आहेत.
: उपमुख्यमंत्र्यांनी घातले होते लक्ष
सुस गावातील स्मशानभूमी जवळील अरुंद रस्त्याची समस्या ही खुप दिवसांपासून प्रलंबित होती. त्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुस गावचे माजी सरपंच नामदेवराव चांदेरे, पी.डब्लू.डी.चे अधिक्षक अभियंता- अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता – अजय भोसले, सहाय्यक अभियंता – नकुल नरसिंग, शाखा अभियंता – दीपक भोसले , पुणे महानगरपालिकेचे सुस गावच्या संपर्क अधिकारी श्रीमती अश्विनी लांडगे व इतर अधिकारी यांच्या समवेत सदर रस्त्यांची पाहणी केली. सदर ठिकाणचा कलवर्त व नाल्याकडील रिटनिंग वॉल बांधून देण्याचे पी.डब्लू.डी.चे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी निश्चित केले आणि त्यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांना तात्काळ काम करण्याची सुचना करण्यात आली .
वरील काम मार्गी लावल्याबद्दल सुस गावांतील नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून आले आहे आणि या कामाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रत्येक्ष काम करण्यास प्राधान्य देणारे, आपला हक्काचा माणूस नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ व गृह प्रकल्पामधील नागरिकांच्या वतीने मनापासून अभिनंदन मानले आहेत.
COMMENTS