Manikrao Thackeray Congress | निवडणुक आयोगाचा गळा भाजपच्या हाती – माणिकराव ठाकरे यांची टिका
Manikrao Thackeray Congress – (The Karbhari News Service) – सर्वांना न्याय मिळावा, निवडणु प्रक्रीया निपक्षपातीपणे व्हावी, यासाठी निवडणुक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आज निवडणुक आयोगाचा गळा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातात ठेवला आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाकडून निपक्षपातीपणे कामकाज होईल, याची शास्वती नाही. संविधानिक संस्था निस्तनाबुथ करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, अशी टीका अखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.
पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी,अजित दरेकर,संजय बालगुडे, नीता परदेशी, सुजित यादव, रफिक शेख, श्री पोळेकर, श्री मेहबूब नदाफ, गुलाम हुसेन, राज अंबिके उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळतेय, हे समोर येत आहे. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी असल्यामुळे ७६ लाख लोकांनी मतदान केले नाही. ग्रामीण भागात व तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल रोष आहे. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे. पंतप्रधान देशाचे असताना ते हिंदु मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. आमच्या जाहीर नाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे, अशी टिका पंतप्रधानांनी करणे दुदैवी आहे. आमच्या जाहीर नाम्यामध्ये मुस्लिमांबद्दल कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या या विधानाने आमच्या न्याय पत्राला (जाहीरनाम्याला) प्रसिद्धी मिळाली.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व पाच जागा इंडिया आघाडी जिंकणार आहे. संपूर्ण राज्यात व देशात काँग्रेस व इंडिया आघाडीला चांगले दिवस आहेत.
शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक बाबींची किंमतीत वाढझालेली आहे. शेतमालास भाव नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे.
देशातील संस्था विकण्याचा धडाका सुरू आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत, याचे परिणाम या निवडणुकीत दिसतील. आघाडीमध्ये सर्वत्र एकोप्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आघाडीचे चारही उमेदवार चांगल़्या मताने निवडून येतील.
काँग्रेसने न्याय पत्र म्हणून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
मोदी यांच्या सत्ताकाळात ३० लाख नोकऱ्या थांबल्या आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर सहा महिन्यातच या नोकऱ्यांची भरतीकेली जाईल. आमच्या न्याय पत्रातशेतकऱ्यांचीकर्जमाफी करू,स्वामीनाथन समितीच्या सिफारशि स्विकारू, महिलांसाठी महालक्ष्मीयोजने अंतर्गत महिलेच्या खात्यात दर वर्षी एक लाख रूपये, आरोग्यासाठी २५ लाख रुपये, आदींचा उल्लेख न्यायपत्रात आहे. हा जाहीरनामा अतिशय चांगला आहे. भाजपने आश्वासने दिली पण ती पाळली नाहीत, त्यामुळे भाजपची चारशे पारची घोषणा पोकळ असून ते २०० सुद्धा पार करणार नाहीत. भाजपच्या जाहीरनाम्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यांनी दिलेली गॅरंटी फसवी आहे, हे लोकांच्या लक्षात आले आहे. जाहीरनाम्यातील तरतुदी काँग्रेस पक्षाच्या सरकारने कर्नाटक, तेलंगणा येथे पूर्ण केल्या आहेत, असेही ठाकरे म्हणाले.
काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील महिलांचे मंगळसूत्र राहणार नाही, हे नरेंद्र मोदी यांचे मत त्यांचा तोल सुटल्याचे द्योतक आहे. वरीष्ठ पद भुषविणाऱ्या व्यक्तीने असे बोलणे दुर्दैवी असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे, असेहीते म्हणाले.
प्रारंभी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माणिकराव ठाकरे यांचे स्वागत केले. राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.
————–
दोन पक्ष फोडल्याचे परिणाम दिसतील:
फडणवीस व भाजपने सुड उगवून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. पवार साहेबांच्या पुण्यास मोदीशहांनी मदत करून पक्ष व चिन्ह काढून घेणे, षडयंत्र रचणे लोकांना पटलेलं नाही. षडयंत्र करणारे कोण आहेत, माहिती आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे केवळ मोहरे आहेत. उमेदवार बदलले, स्वाभिमान शिल्लक राहिला नाही. अजित पवारांना चार उमेदवार दिले त्यातही दोन उमेदवार भाजपने दिले.
———
शिंदे – पवारांनी पायावर दगड मारून घेतला :
अजित पवार पूर्वी राज्यातील निवडणुकीच्या जागा ठरवत असत, पवार साहेब कधीही त्यात हस्तक्षेप करत नव्हते. आज अजित पवारांची आवस्था काय आहे, ऐवढे मिंधे होण्याची गरज काय, भाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले.
उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना काय नाही दिले. सर्व निर्णय शिंदे घेत होते. त्यावेळी या दोघांना जी उंची होती ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजप सोबत जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे.
————–
आघाडीसाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला :
देशातील परिस्थिती पाहून काँग्रेसने पुढाकार घेवून आघाडी केली. त्यामुळे आघाडीत कमी जास्त होऊ शकते. सर्वांना सोबत घेवून जाण्याची काँग्रेसची भूमीका आहे. शिवसेना व काँग्रेस नेते एकत्र बसुन सांगली बाबत निर्णय घेतील. शिस्तीच्या बाहेर कोण जाणार नाही, असेही ते म्हणाले.