Third Party Inspection | पुणे महापालिकेच्या विकास कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत होणार तांत्रिक गुणवत्ता तपासणी  | महापालिका आयुक्तांनी विभाग प्रमुखांवर सोपवली जबाबदारी 

HomeBreaking Newsपुणे

Third Party Inspection | पुणे महापालिकेच्या विकास कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत होणार तांत्रिक गुणवत्ता तपासणी  | महापालिका आयुक्तांनी विभाग प्रमुखांवर सोपवली जबाबदारी 

Ganesh Kumar Mule Dec 14, 2022 1:17 PM

GST : PMC : Audit : GST लागू नसताना GST लावत  सादर केली जातात बिले  : महापालिकेच्या विभिन्न खात्यांचे प्रताप 
Progress Report | PMC Pune | 25 कोटींच्या वरील कामाचा दर 15 दिवसांनी आयुक्तांना अहवाल द्यावा लागणार
Emergency works | प्रत्येक प्रभागात तातडीच्या कामांसाठी 1 कोटी | वित्तीय समितीत महापालिका आयुक्तांची मान्यता

महापालिकेच्या विकास कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत होणार तांत्रिक गुणवत्ता तपासणी

| महापालिका आयुक्तांनी विभाग प्रमुखांवर सोपवली जबाबदारी

पुणे | महानगरपालिकेमार्फत ( pmc pune) विविध नागरी सुविधा (Infrastructure) पुरविण्यात येतात. यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध विकास कामे (Development work) करण्यात येतात. त्यामधून करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा (quality of work) अपेक्षित मानकांप्रमाणे असणे आवश्यक आहे. पुणे मनपामार्फत विकसित करण्यात येणारी विविध विकास कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने व्हावीत व त्यामधून टिकाऊ माल व्हावा यासाठी कामांच्या दर्जाचे त्रयस्थ संस्थेमार्फत (Third party audit) अधिक प्रभावी व परिणामकारक गुणवत्ता हमी होणे आवश्यक आहे. त्यानुसार  विकास कामांची मे. इंजीनिअर्स इंडिया लि. (भारत सरकारचा उपक्रम) या त्रयस्त संस्थेमार्फत तांत्रिक गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे. याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांनी (PMC commissioner) विभाग प्रमुखांवर सोपवली आहे. याबाबत आयुक्तांनी आदेश (circular) जारी केले आहेत.

पुणे मनपा कडील विविध विकास कामांकरिता थर्ड पार्टी कॉलिटी अॅश्युरन्स सर्विसेसची कामे मे. इंजीनिअर्स इंडिया लि. (भारत सरकारचा उपक्रम) यांचे मार्फत महाराष्ट्र महापालिका अधिनियम शेड्युल चॅप्टर कलम ५(२) (२) अन्वये काम करून घेणेस तसेच कामांच्या रकमेच्या मान्य दराने (अधिक प्रचलित कर) नुसार बिल अदा करणेस व नव्याने करारनामा करणेस महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांची स्थायी समिती ठराव अन्वये  मान्यता प्राप्त आहे. (Pune Municipal corporation)
त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम शेड्युल चॅप्टर कलम ५ (२) (२) अन्वये मे इंजीनिअर्स इंडिया लिं. (भारत सरकारचा उपक्रम) यांचे मार्फत कामांची गुणवंत्ता तपासणीसाठी त्रयस्थ संस्था म्हणून क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळे व मुख्य खाते अंतर्गत दरवर्षी होणान्या विविध विकास कामांकरिता (दुरुस्ती व देखभाल विषयक कामे वगळून) मार्च २०२७ अखेर पर्यंत पुढील पाच वर्षासाठी नियुक्ती केली जाणार आहे.
क्षेत्रीय कार्यालये तसेच परीमंडळे अंतर्गत दरवर्षी र.रु. ५.०० लाखांवरील होणाऱ्या भांडवली (दुरुस्ती व देखभाल विषयक कामे वगळून) कामाकरिता होणान्या कामांच्या कार्यान्वित मूल्यावर १.५०% दरानुसार देयक अदा करण्यात येईल.

मे.इंजीनिअर्स इंडिया लि. (भारत सरकारचा उपक्रम) या संस्थेमार्फत स्थापत्य विषयक विविध विकास कामांचा दर्जा, तांत्रिक परीक्षण व गुणवत्ता तपासणी या अनुषंगाने या संस्थेमार्फत पुणे मनपाच्या मुख्य खात्यांचा सन २००५ पासून थर्ड पार्टी फॉलिटी अॅश्युरन्सचा अनुभव तसेच पथ विभाग, पाणी पुरवठा, मलनिःसारण आणि भवन रचना विभाग यांचेमार्फत विकसित करण्यात आलेल्या कामांमध्ये झालेल्या महत्वपूर्ण सुधारणा, पुणे मनपामार्फत विकसित करण्यात येत असलेल्या IWMS संगणक प्रणाली आणि EIL संस्थेमार्फत थर्ड पार्टी क्वॉलिटी अॅश्युरन्स करिता वापरण्यात येत असलेली संगणक प्रणाली आणि मोबाईल अॅप यांचे एकत्रिकरण करण्यात येत असून याद्वारे प्रचलित पद्धती नुसार लागणाऱ्या कालावधीमध्ये बचत होणार असून सर्व कामे सुलभ होणार आहेत.

स्थायी समिती ठराव  अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने पुणे मनपामार्फत अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार तसेच राज्य शासन, केंद्र शासन व आंतरराष्ट्रीय संस्था यांचे मार्फत निविदा प्रक्रियाद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालये, परीमंडळ १ ते ५, मुख्य खाते आणि पुणे मनपाच्या विविध विभागांमार्फत विकसित होणाऱ्या सर्व भांडवली व महसुली कामांचे थर्ड पार्टी कॉलिटी अॅश्युरन्स फक्त मे. इंजीनिअर्स इंडिया लि. (भारत सरकारचा
उपक्रम) या त्रयस्त संस्थेमार्फत करणेत यावे. उपरोक्त बाबींची काटेकोर अंबलबजावणी करणेची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहील. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.