उद्यापासून पुकारलेला शेतकरी संघटनेचा संप काही काळ स्थगित
: प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांची माहिती
पुणे : उद्या 1 नोव्हेंबर 21 पासून होणारे शेतकरी संपाचा आंदोलने आम्ही आठ दिवसांसाठी स्थगित केलेला आहे. कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेले आहेत. कारखान्यांनी पहिला हप्ता जो आहे तो एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान देतात की नाही देतात हे पाहणे आणि त्यानंतर 16 नोव्हेंबरला ऊसाचा दुसरा हप्ता दिलेला नसेल तर महाराष्ट्र राज्यांमध्ये शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी निश्चितपणे पुन्हा उग्र आंदोलन राज्यभर उभा करेल. त्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र सरकार, साखर आयुक्तालय, विभागीय साखर सहसंचालक, कलेक्टर, विभागीय आयुक्त यांचे वरती राहील, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद जोशी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी दिली.
: सरकारला दिवाली कशी गोड लागते?
पवार राजे म्हणाले, राज्यामध्ये साधारण 2013/14 पासून सातत्याने गारपीट बिगरमोसमी पाऊस, वादळ वारा, सततचे सुलतानी व आस्मानी संकट यामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत आलेला आहे. काॅंग्रेस सरकार असेल किंवा 14नंतरचे भाजप सरकार असेल किंवा आघाडीच्या सरकारच्या या सर्व सरकारमध्ये सर्वांनी ज्या ज्या वेळी विरोधी पक्ष नेत्यांच्या भूमिका बजावल्या त्यावेळी त्यांनी शेतकर्यांची बाजू मांडली. मात्र सत्तेवर गेल्याच्यानंतर यांनी सातत्याने शेतकऱ्यांची बाजू केवळ कागदोपत्री मांडलेल्या यामुळे गेल्या 2013/14 पासून तर आजच्या दिवसापर्यंत राज्यात जवळपास 15 ते 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या ना कुठल्या आजारामुळे, अपघाता मुळे झालेले नाहीत कोविड मुळे झालेले नाहीत किंवा कोणत्या भांडणामुळे, या आत्महत्या केवळ शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही पीक विम्याचे, पीक संरक्षण नाही. सरकारने प्रत्येकवेळी केवळ जीआर व आश्वासने देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. कोणत्याही प्रकारची पुर्ण कर्जमाफी नाही किंवा वीज बिल मुक्ती नाही त्या संदर्भातला एकही विचार या सरकारांनी कधी केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आणि या सर्व आत्महत्याना राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार आहे. म्हणून यावर्षीची कोविड नंतरच्या दुसऱ्या वर्षातही शेतकऱ्यांच्या 3500 हजार आत्महत्या झाल्या नतरही राज्यकर्त्यांना, राज्य सरकार मधल्या शासन प्रशासन अधिकारी खासदार आमदार मंत्री यांना दिवाळी गोड कसे लागते! असा प्रश्न पवार यांनी विचारला आहे.
COMMENTS