खडकवासला धरणाचे पाणी दूषित असल्याचे राज्य सरकारने देखील केले मान्य | पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
| सर्व संस्थांनी एकत्र येत उपाययोजना करण्याची आवश्यकता
याबाबत भाजपाचे आमदार भीमराव तापकीर यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. त्यावर सरकारने केलेल्या खुलाशातून ही माहिती समोर आली आहे. सरकारच्या माहितीनुसार खडकवासला, पानशेत व वरसगांव या धरण क्षेत्रात दोन्ही तीरांवर गावे वसलेली आहेत. या गावातील वापरलेले सांडपाणी धरणांचे जलाशयाच्या पाण्यात मिसळते. तसेच खडकवासला धरणाच्या वरील बाजूस असलेल्या खाजगी उद्योगांचे सांडपाणी जलाशयात येते. खडकवासला जलाशयाचे वरील बाजूस नदीचे उजव्या तीरावर खडकवासला, गोऱ्हे बु., गोऱ्हे खु., खानापूर, डोंजे, मालखेड, ओसर्डे, निगडे, वरदाडे, सोनापूर, रूळे, आंबी, कुरण खु. ही १३ गावे व डाव्या तीरावर कुडजे, खडकवाडी, आगळंबे, मांडवी खु. मांडवी बु. सांगरून, खानवडी, डावजे, जांभळी, व कुरण बु. ही १० गावे आहेत.
१) जिल्हा परिषदेमार्फत जुन्या गावठाणांसाठी STP उभारून कार्यान्वित करावे.
२) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने धरण परिसरात नव्याने हॉटेल, बंगले व रिसॉर्ट इ. यांना बांधकाम परवानगी देताना मैलपाणी शुद्धीकरण केंद्रे (STP) बंधनकारक करावे.
३) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बंद स्थितीत असलेली मैलपाणी शुद्धीकरण केंद्रे (STP)
तातडीने कार्यान्वित करून घेण्यात यावीत व कोणत्याही परिस्थित सांडपाणी विनाप्रक्रिया जलाशयात
मिसळणार नाही यांची दक्षता घ्यावी.