“ती” बस टॉयलेटच्या वापरासाठी आता पैसे नाही पडणार!
: बस बाबत महिला बाल कल्याण समितीचे सदस्य समाधानी
: सदस्यांनी बस ची केली पाहणी
पुणे : पुणे शहरामध्ये महिलांकरिता ११ “ती” बस टॉयलेट कार्यरत आहेत. स्वच्छ “ती” बसटॉयलेटमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन, टॉयलेट सीट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृती विषयक माहिती देण्यासाठी टीव्ही इत्यादी सुविधा आहेत. ‘ती” बस टॉयलेटची दैनंदिन देखभाल दुरूस्ती व अनुषंगिक कामे ११ महिने करिता प्रायोगिक तत्वावर करणेबाबत साराप्लास्ट यांचे समवेत करारनामा करण्यात आला होता. तो संपला असून नवीन करारनामा करण्याबाबत प्रशासनाकडून महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यावर मागील बैठकीत चर्चा झाली होती कि समितीचे सदस्य ती बस ची पाहणी करतील. त्यानंतरच सदरच्या प्रस्तावाला मंजुरी द्यायचे अथवा नाही, हे ठरवले जाईल. त्यानुसार सदस्यांनी मंगळवारी या बस ची पाहणी केली. समितीचे सदस्य या बस च्या सुविधे बाबत समाधानी आहेत. मात्र काही उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यामध्ये बस मध्ये खाद्य पदार्थ ठेवण्यास मनाई करण्यात येईल. शिवाय बस टॉयलेट वापरासाठी पैसे घेतले जाणार नाहीत. याचा यामध्ये समावेश असेल. अशी माहिती समितीच्या अध्यक्षा रुपाली धाडवे यांनी दिली.
: प्रशासनाचा असा आहे प्रस्ताव
: खाद्य पदार्थाची विक्रीला विरोधच
सदस्यांनी मंगळवारी या बस ची पाहणी केली. समितीचे सदस्य या बस च्या सुविधे बाबत समाधानी आहेत. मात्र काही उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यामध्ये बस मध्ये खाद्य पदार्थ ठेवण्यास मनाई करण्यात येईल. कारण या आधी देखील खाद्य पदार्थ ठेवण्यास विरोध झाला होता. शिवाय बस टॉयलेट वापरासाठी पैसे घेतले जाणार नाहीत. याचा यामध्ये समावेश असेल. समितीची बुधवारी बैठक घेण्अयात आली. मात्र तहकूब करण्यात आली. आता पुढील बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती समितीच्या अध्यक्षा रुपाली धाडवे यांनी दिली.
—
ती बस च्या प्रस्तावावर मागील बैठकीत चर्चा झाली होती कि समितीचे सदस्य ती बस ची पाहणी करतील. त्यानंतरच सदरच्या प्रस्तावाला मंजुरी द्यायचे अथवा नाही, हे ठरवले जाईल. त्यानुसार सदस्यांनी मंगळवारी या बस ची पाहणी केली. समितीचे सदस्य या बस च्या सुविधे बाबत समाधानी आहेत. मात्र काही उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर केला जाईल.
COMMENTS