पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली
: बुधवारी मिळाले 1805 पॉजिटीव्ह रुग्ण
पुणे : पुणे शहरात कोरोनाचा कहर वाढताना पाहायला मिळतो आहे. तीन दिवसापूर्वी 400-500 च्या रुग्णांचा आकडा आता 1800 च्या पार जाऊन पोचला आहे. मंगळवारी 1104 रुग्ण होते तर बुधवारी 1805 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 5464 झाली आहे.
: मृत्यू कमी
कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहून महापालिकेने पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद केल्या आहेत. शिवाय काही नियम देखील कडक केले आहेत. मात्र शहरात कोरोनाचा कहर वाढताना पाहायला मिळतो आहे. तीन दिवसापूर्वी 400-500 च्या रुग्णांचा आकडा आता 1800 च्या पार जाऊन पोचला आहे. मंगळवारी 1104 रुग्ण होते तर बुधवारी 1805 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 5464 झाली आहे. दरम्यान त्या तुलनेत कोरोनाने होणारे मृत्यू मात्र कमी आहेत. ही दिलासादायक बाब आहे. बुधवारी शहरात 0 मृत्यू होते.
दिवसभरात १८०५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना १३१ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.
-७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५१४४९४.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४६४.
– एकूण मृत्यू -९११९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९९९११.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३४४३
COMMENTS