पंतप्रधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस उद्या करणार मूक आंदोलन
: सकाळी १० वाजता आंबेडकर स्मारक येथे होणार आंदोलन
पुणे : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून सातत्याने सरकारमधील विविध घटक मंत्री, राज्यपाल सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या राज्यघटनेचा अवमान करत आहे, दलितांचा आवाज वारंवार दाबण्याचा प्रयत्न होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमिचा अपमान करत आहे आणि पुन्हा त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुण्यात अनावरण होत आहे, या घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उद्या ६ मार्च रोजी ससून हॉस्पिटल जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे शांततेच्या मार्गाने काळे कपडे परिधान करत महात्मा गांधीजी व महापुरुषांची भजने गात मूक आंदोलनासाठी बसणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी मी आज फेसबुक लाईव्ह द्वारे सदर मेट्रो मार्गाची पाहणी केली. अवघ्या पाच किलोमीटरच्या या मेट्रो मार्गाचे काम अर्धवट स्वरूपात असून, हे काम पूर्ण होण्यास किमान तीन महिने लागतील.एस एन डी टी कॉलेज जवळील स्टेअरकेस, पत्रे ,प्लास्टर, पेंटिंग, वेल्डिंग, रेलिंग ही सर्वच काम अर्धवट परिस्थितीत असून ,ही काम पूर्ण नाही झाली तर पुणेकर ही मेट्रो वापरू शकत नाहीत. मेट्रोच्या कामाची अत्यंत दयनीय परिस्थिती असताना ,निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणेकरांची फसवणूक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवण्यात येत आहे. मुळात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील निवडणुकांमधून मोदींनी युक्रेन मध्ये अडकलेल्या मुलांसाठी वेळ काढला नाही, परंतु अर्धवट स्वरूपात असलेल्या मेट्रोसाठी वेळ काढला. यावरून भाजपची कामकाजाची पद्धत आपणा सर्वांना दिसून येते. असे ही जगताप म्हणाले.
: शहर कॉंग्रेस कडून देखील होणार निदर्शने
दरम्यान शहर कॉंग्रेस कडून देखील पंतप्रधानाच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. शहर कॉंग्रेस च्या वतीने घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती शहर कॉंग्रेस कडून देण्यात आली.
COMMENTS