कमळ चिखलात फुलते गाळात नाही; पावसाने भाजपची चांगलीच पोलखोल
| राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुखाची टिका
काल पुण्यामध्ये या वर्षीच्या पडलेल्या पहिल्याच पावसाने गेली पाच वर्ष सत्तेवर असलेल्या भाजपची चांगलीच पोलखोल केलेली आहे. काल संपुर्ण शहरभर रस्त्यांवर पाणी तुंबले होते, वाहतुक खोळंबली होती व पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. पाशवी बहुमताच्या बळावर पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर पुणे करांचे प्रश्न सोडवायचं सोडून सत्तेवर राहून फक्त कमिशनचा मलिदा खाणाऱ्या टेंडर मध्ये अडकलेल्या भाजपा मुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. असा आरोप राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे.
देशमुख म्हणाले, : शहराच्या ज्या मध्यवर्ती भागात भाजपाचे वर्षानुवर्षे प्राबल्य राहीलेलं आहे त्या भागाला तर छोट्या ओढया नाल्याचे स्वरूप आले होते. स्वत:च्या पक्षाचे खासदार , आमदार व सभागृह नेते , स्थायी समिती अघ्यक्ष व बहुसंख्य नगरसेवक जेथून निवडून येतात त्यांना येथील प्रशंनाकरीता दोन दिवसांपूर्वी आंदेलन करावे लागले. ह्यातच त्यांनी आपल्या अपयशाची जाहीर कबूली दिलेली आहे व आपण सत्तेत बसण्यास लायक नाही हे त्यांनी मान्यच केले.
देशमुख पुढे म्हणाले, शहरतील सर्वात जास्त निधी ज्या भागात खर्च केला तेथेच ही परिस्थती असेल तर ह्यांच्या नगरसेवकाचे लक्ष कामात होते की मलई खाण्यात होते हे सर्व पुणेकरांना आता कळाले आहे. आचा-याने स्वत:च बनविलेल्या जेवनावर जेवणा-यांसमोर येवून ते किती खराब आहे हेच सांगण्यासारखा हा प्रकार आहे. एकीकडे ही कामे आम्ही केली असे लिहलेले बोर्ड व दुसरीकडे कामेच नाही झाली म्हणून आंदोलन करायचे. भाजपवाल्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत गटबाजीमध्ये पुणेकरांना ओढू नये येत्या मनपा निवडणूकीत पुणेकरांचे ठरले आहे हे त्यांनी निश्चित लक्षात ठेवावे. असे ही देशमुख म्हणाले.