Pune News | पुणे शहरासह हडपसरच्या विकासाठी राज्य सरकार कटिबद्ध – मंत्री उदय सामंत

HomeBreaking News

Pune News | पुणे शहरासह हडपसरच्या विकासाठी राज्य सरकार कटिबद्ध – मंत्री उदय सामंत

Ganesh Kumar Mule Mar 29, 2025 9:21 AM

Heat stroke | उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी | राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत | मुख्यमंत्री
Shivsena Pune – BJP Pune | प्रमोद नाना भानगिरे आणि विशाल धनवडे यांच्यात दिलजमाई!
Pune Municipal Corporation Latest News | | PMC employees and officers suffering from the work of seniors!

Pune News | पुणे शहरासह हडपसरच्या विकासाठी राज्य सरकार कटिबद्ध – मंत्री उदय सामंत

| हडपसर मतदारसंघात ९३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न !

 

Hadapsar Constituency – (The Karbhari News Service) – हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २६ मधील ९३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री व शिवसेना पुणे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत आणि रोहयो कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, रमेश बापू कोंडे, शंतनू जगदाळे, महादेव दंदी यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

हडपसर विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळाली असून हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २६ मधील तब्बल ९३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये कै. दत्तोबा उर्फ आप्पा शंकरराव तरवडे संतसृष्टीतील २१ फुटी विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे आणि संतसृष्टीचे लोकार्पण, बाल उद्यान, कौसरबाग कोंढवा हडपसर येथील स्केटिंग ग्राउंड, महात्मा जोतिराव फुले जलतरण तलाव, कड नगर ते हांडेवाडी पीपीपी तत्वावर सुरू असलेल्या कामाचे लोकार्पण याचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, महायुती सरकारच्या कार्यकाळात अनेक विकासकामांनी जोर धरला. पुणे शहरात देखील विकासाचा आलेख उंचावला आहे. त्याचबरोबर शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातून हडपसरच्या विकासाची गंगा वाहती झाली आहे. या विकासाच्या गंगेला विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आणखी वाहती करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहयो कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचा मोठ्या प्रमाणावर विकास करीत राज्याला नव्या उंचीवर घेवून जाण्याचं कार्य केलं. यात आरोग्य, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, युवक, महिलांसाठी अनेक योजनांना निधी उपलब्ध करून दिला. याच उदात्त हेतूने पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. हडपसरच्या झालेल्या विकासामुळे येथील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतोय आणि हा बदल घडवण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केलं याचा निश्चितच आनंद आहे. यापुढे देखील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास असल्याचे मत व्यक्त केले.

शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासात्मक बदल घडवून आणले. यासह हडपसर मतदारसंघासाठी देखील भरघोस निधींची तरतूद करून पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना लोकहितला अधिकाधिक प्राधान्य देऊन कार्यरत राहत आहे. पी पी पी तत्त्वावर करण्यात आलेल्या बायपास मुळे हडपसर मतदार संघातील लाखो नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होत त्यांचा वेळ वाचणार आहे तसेच जनतेच हित लक्षात घेवूनच नागरिकांना लागणाऱ्या सोईसुविधा उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे तसेच यापुढील काळात नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.