आधुनिक लहुजी सेनेची पहिली राज्य स्तरीय बैठक पुणे येथे संपन्न
आधुनिक लहुजी सेना या सामाजिक संघटनेची राज्य स्तरीय बैठक पुणे येथे 11 फेब्रुवारी रोजी पुणे येथील अल्पबचत भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये मातंग समाजाच्या विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रश्नांवर राज्यभरातून जमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून प्रदिर्घ आढावा घेण्यात आला. अशी माहिती संघटनेचे सचिव भावेश कसबे यांनी दिली.
मातंग समाजाचा बुलंद आवाज म्हणून राज्यभर कार्यरत असणारी आधुनिक लहुजी सेना या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या सूचनेनुसार राज्य कार्यकारिणीची पहिली बैठक संघटनेचे राज्य सचिव भावेश कसबे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून संपन्न झाली.
या बैठकीमध्ये मातंग समाजाच्या विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रश्नांवर राज्यभरातून जमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून प्रदिर्घ आढावा घेण्यात आला. तसेच, याच बैठकीत आगामी काळात “सकल मातंग समाजाच्या वतीने 22 फेब्रुवारी 2023 रोजी, मुंबई आझाद मैदानावर होत असलेल्या, “जवाब दो आंदोलनामध्ये” सहभागी होण्याचे ठरविण्यात आले.”
याबरोबरच समाज संघटना वाढीसाठी नवी दिशा आखण्यात आली . या बैठकीसाठी राज्यभरात संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, सर्व विभागीय अध्यक्ष, पदाधिकारी,व सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते.