Difference In pay : 7th pay Commission : मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक आता आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर!  

HomeBreaking Newsपुणे

Difference In pay : 7th pay Commission : मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक आता आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर!  

Ganesh Kumar Mule Mar 23, 2022 3:27 PM

Non teaching staff | Agitation | मनपा शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
8th Pay Commission Update | 8 व्या वेतन आयोगाची केंद्र सरकारची तयारी सुरू!
DA Hike Circular | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! | कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू | DA बाबतचे सर्क्युलर जारी

मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक आता आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर!

: वित्त व लेखा विभागाचा प्रस्ताव आयुक्तांकडे

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोव्हेंबर पासून सुधारित वेतन देखील मिळू लागले आहे. मात्र 1 जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर पर्यंतची फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. याबाबत कर्मचारी वर्गातून ओरड सुरु आहे. दरम्यान नुकताच वित्त व लेखा विभागाने हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवला आहे. मात्र निधी कमी पडत असल्याने यावर आयुक्तांनी मार्गदर्शन करावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. दरम्यान पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची नुकतीच याबाबत भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवत खर्चाचा आढावा घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन संघटनेला दिले.

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/ कर्मचारी यांना  शासन आदेशानुसार ७ वा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असून सुधारीत वेतनश्रेणी नुसार माहे नोव्हेंबर २०२१ चे वेतन प्रत्यक्ष आदा करण्यात आलेले आहे.  ७ व्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष वेतन दिनांक ०१.०१.२०२१ पासून देणेबाबत नमूद आहे. त्यानुसार मनपा अधिकारी/ कर्मचारी यांना दि.०१.०१.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीतील वेतनातील फरकाच्या थकबाकीची रक्कम रोखीने त्वरित आदा होणे आवश्यक आहे. मात्र 10 महिन्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे.

दरम्यान वित्त व लेखा विभागाने फरक देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठवला आहे. मात्र विभागाने फरक देण्याबाबत आयुक्तांकडून मार्गदर्शन मागितले आहे. कारण 10 महिन्याचा फरक देण्यासाठी 188 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात अंदाजपत्रकात शिल्लक रक्कम 120 कोटी आहे. म्हणजे 68 कोटी रक्कम कमी पडत आहे. त्यामुळे ही रक्कम कशी द्यायची याबाबत वित्त विभागाने आयुक्तांचे मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळण्यासाठी आता आयुक्तांच्या मार्गदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.
 वेतन आयोगाच्या फरकाच्या प्रस्तावाबाबत नुकतीच आम्ही आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. तसेच खर्चाचा आढावा घेऊन 27 ते 28 मार्च नंतर हा विषय मार्गी लावू. असे आश्वासन दिले आहे.
: प्रदीप महाडिक, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन.

COMMENTS

WORDPRESS: 6
  • comment-avatar
    Sunil Bhagwan Alhat 3 years ago

    Very good decision Thanks Sir.

  • comment-avatar
    Sunil Bhagwan Alhat 3 years ago

    Very good decision Thanks Sir.

  • comment-avatar
    Manojpore 3 years ago

    Good dissicion but not to delayed for long period

  • comment-avatar
    Mangesh Kamble 3 years ago

    Very nice dissicion Tnx sir but plz don’t B Delayed 4 long period ??

  • comment-avatar
    Mangesh Kamble 3 years ago

    Very nice dissicion Tnx sir but plz don’t B Delayed 4 long period ??

  • comment-avatar
    Sandeep adagale 3 years ago

    ईतर बिले पास करण्याचे थांबवून कर्मचाऱ्यांचे हक्काचे कशाला अडवायचे

DISQUS: 1