Information and Public Relations Department | माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपायुक्तांचा पदभार अचानक बदलला     | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे आदेश 

HomeपुणेBreaking News

Information and Public Relations Department | माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपायुक्तांचा पदभार अचानक बदलला  | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Apr 22, 2023 2:28 PM

Deputy Commissioner | पदोन्नतीने उपायुक्त झालेल्या अधिकाऱ्यावर सोपवली ‘ही’ जबाबदारी | महापालिका आयुक्तांचे आदेश
Deputy Commissioners | PMC | महापालिकेचे तीन ‘सहायक आयुक्त’ होणार ‘उपायुक्त’
Deputy Commissioners | PMC Pune | महापालिकेत अजून एक  उपायुक्तांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती

माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपायुक्तांचा पदभार अचानक बदलला

| अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे आदेश

पुणे | महापालिकेच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या उपायुक्त यांचा पदभार बदलून नवीन अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांनी हे आदेश जारी केले आहेत.
माहिती आणि जनसंपर्क विभागाची जबाबदारी उपायुक्त सचिन इथापे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून नुकताच हा पदभार काढून घेण्यात आला आहे. आता ही जबाबदारी उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अचानक असे पदभार बदलत राहतात. त्याचे नेमके कारण समजून येत नाही. मात्र आयुक्तांच्या या भूमिकेची अधिकाऱ्यांमध्ये मात्र चर्चा होते.