Agitation | Contract Employees | कंत्राटी मोटार सारथी व कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

HomeपुणेBreaking News

Agitation | Contract Employees | कंत्राटी मोटार सारथी व कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

Ganesh Kumar Mule Mar 10, 2023 2:01 PM

Congress Pune | केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांचे नसून केवळ हम दो हमारे दो चे – अरविंद शिंदे
NCP Strike | हक्काच्या पाण्याकरिता स्वारगेट पाणी पुरवठा विभाग येथे राष्ट्रवादीचे उपोषण
Thackeray Group | Pune| निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाची निदर्शने

 कंत्राटी मोटार सारथी व कामगारांना कामावरून कमी न करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

| कामगार संघटनेकडून निदर्शने

कंत्राटी मोटार सारथी यांच्या कंत्राटदार जरी बदलला तरी मोटार सारथी व कामगार यांना कामावरून कमी करू नये. तसेच मोटार सारथी कडून कर्तव्य बजावत असताना अनावधानाने अपघात झाला तर त्यांच्याकडून भरपाई करून घेऊ नये. भविष्य निर्वाह निधी व ई. एस. आय. ची रक्कम भरून उपचारासाठी दवाखान्याचे कार्ड काढून देणे, वेतन चिठ्ठी व ओळखपत्र तसेच गणवेश इत्यादी सुविधा देणे शिवाय अपघात नुकसान भरपाई देणे तसेच कर्तव्य बजावत असताना नैसर्गिक किंवा अपघातात कामगार मृत्यूमुखी पडला तर त्यांच्या वारसांना मानवतेच्या दृष्टिकोनातून कामावर घ्यावे या व इतर मागण्यांसाठी आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारा जवळ कामगार संघटनेकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले कि यातील कुणालाही कामावरून कमी केले जाणार नाही. (PMC contract Employees)

पुणे महानगरपालिकेत महानगरपालिकेत व्हेईकल डेपो व १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत कचरा वहातुक, सार्वजनिक स्वच्छता व सर्व खात्यातील व अस्थापना विभागात कंत्राटी पद्धतीने महानगरपालिकेची जहाज रूपी यंत्रणेचे सारथ्य करणारी १३७० कंत्राटी पद्धतीने काम करणारे मोटार सारथी गेली पंधरा वर्षापासून महानगरपालिकेत अतिशय तुटपुंजा वेतनामध्ये काम करत आहेत. तसेच कोविडच्या कालखंडामध्ये हे सर्व मोटार सारथी स्वतःच्या जीवाची परवा न करता दवाखान्याच्या अँब्युलन्सवर कोविडने मृत्यू पावलेले प्रेते व व रुग्णांची सेवा केली त्यामध्ये काम करता करता १३ कंत्राटी कामगार व मोटार सारथी मृत्युमुखी पडले त्यांचे कुटुंबे उध्वस्त झाली तरीही प्रशासनाने व संबंधित कंत्राटदाराने कोणत्याही पद्धतीची मदत केली नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या धोरणानुसार पंधरा वर्षाखालील सर्व जुनी वाहने स्क्रॅप होणार आहेत. (Vehicle depot)

त्यामुळे व्हेईकल डेपो मधील कामाचे कंत्राट संपणार आहे त्या ठिकाणी कंत्राटदारा मार्फतच नवीन वाहनासहित निविदा मान्य केलेले आहेत त्यामुळे त्या वाहनावर संबंधित ठेकेदाराचेच नवीन मोटार सारथी व कामगार असणार आहेत असे खबर कामगार युनियनला लागली. त्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. (PMC kamgar union)

या निदर्शनामध्ये मार्गदर्शन करत असताना युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट असे म्हणाले की,” महानगरपालिकेच्या प्रशासनाने निविदेच्या अटी शर्तीचे पालन करावे तसेच कंत्राटदार जरी बदलला तरी मोटार सारथी व कामगार कदापिही बदलू देणार नाही. त्यांनाच नवीन कंत्राटदारांच्या गाडीवर काम द्यावे. तसेच त्यांना किमान वेतनाप्रमाणेच वेतन अदा करावे त्यांच्या वेतनातून एकही रुपया कमी करू देणार नाही आणि कोणत्याही मोटार सारथीला व कामगारांना कमी करू देणार नाही जर प्रशासनाने या कामगारांवर अन्याय केला तर युनियन म्हणून आम्ही तो सहन करणार नाही असे प्रशासनाला ठणकावले”. (PMC Pune)

सदर कामगारांच्या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त रवींद्र बिनवडे यांना देण्यात आले. तसेच अतिरिक्त आयुक्त व्हेईकल डेपोचे उपायुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. एकही मोटार सारथी व कंत्राटी कामगार कमी केला जाणार नाही अशा आश्वासन युनियनला दिले.

सदर निदर्शनामध्ये युनियनचे संयुक्त चिटणीस कॉ. मधुकर नरसिंगे, उपाध्यक्ष कॉ. शोभा बनसोडे कॉ. सुदाम गोसावी, कॉ. दिलीप काबळे, कॉ. अनंत मालप, कॉ. मदन प्रधान, कॉ. वैजीनाथ गायकवाड, विभागीय अध्यक्ष कॉ. राम अडागळे, कॉ. रमेश पारसे, कॉ. शरद , कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, कॉ. प्रकाश हुरकडली, कॉ. प्रकाश चव्हाण, कॉ. निलेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. समारोप कॉ. शोभा बनसोडे यांनी केले. तसेच सदर निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.